प्रभासचे स्वप्न झाले पूर्ण; पण चाहत्यांच्या पदरी निराशाच

'प्रोजेक्ट के' या चित्रपटाचे शूटिंग एकाच वेळी पूर्ण होऊ शकणार नाहीये. ज्यामुळे चित्रपट लांबणीवरती पडणार आहे.
Prabhas
PrabhasDainik Gomantak
Published on
Updated on

प्रभास (Prabhas) आणि अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा 'प्रोजेक्ट के' हा चित्रपट सध्या खूपच चर्चेत आला आहे. चित्रपटाचे शूटिंग सुरू झाल्यापासून अमिताभ बच्चन आणि प्रभास यांच्या सेटवरच्या बाँडिंगचे किस्से चाहत्यांना सतत पाहायला मिळत आहेत. पण आता अशी बातमी येत आहे की, प्रभासच्या चाहत्यांना या चित्रपटासाठी बराच काळ वाट पाहावी लागणार आहे. खरं तर प्रभासच्या या मोठ्या प्रोजेक्टबद्दल काही गोष्टी समोर येत आहेत. या साय-फाय थ्रिलर प्रोजेक्टबद्दल बातमी आहे की, या चित्रपटाचे शूटिंग एकाच वेळी पूर्ण होऊ शकणार नाहीये. ज्यामुळे चित्रपट लांबणीवरती पडणार आहे. अशा परिस्थितीत या तिन्ही स्टार्सना या चित्रपटाच्या शूटिंगसाठी त्यांच्या वेळा आणि तारखा जुळवाव्या लागणार आहेत. (Prabhas dream of working with Amitabh Bachchan is about to come true)

Prabhas
अक्षय कुमारच्या 'बच्चन पांडे'ला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद

कारण काय आहे?

टॉलीवूडच्या रिपोर्ट्सनुसार, हा प्रोजेक्ट एका स्ट्रेचमध्ये पूर्ण होऊ शकत नाहीये, या चित्रपटाचे शूटिंग दर महिन्याला फक्त 7-8 दिवस केले जाणार आहे. वास्तविक, हा चित्रपट एक साय-फाय थ्रिलर आहे ज्याच्या शूटसाठी अनेक प्रकारचे गॅजेट्स आणि गुणधर्म आवश्यक असणार आहेत, जे एकाच वेळी मिळणे कठीण होत आहे. अशा परिस्थितीत, गॅजेट्सची व्यवस्था केल्यानंतर आणि नंतर सर्व काही सेट केल्यानंतर, चित्रपटावरती काम करण्यासाठी महिन्यातून 7-8 दिवस असणार आहेत. अशा परिस्थितीत या शेड्यूलनुसार चित्रपट खूप उशिरा तयार होईल, असा अंदाजही वर्तवला जात आहे.

प्रभासने स्पष्ट केले होते, आणि स्वप्न सत्यात उतरले आहे

या चित्रपटात काम करताना प्रभासचे एक स्वप्न पूर्ण होत आहे, महानायक अमिताभ बच्चन, दीपिका पादुकोण (Deepika Padukone) यांच्यासोबत काम करण्याचे स्वप्न आहे तर या चित्रपटात सर्वजण ग्लॅमरस अवतारात दिसणार आहे. याआधी प्रभासच्या फॅन बॉय मोमेंटचे किस्सेही समोर आले होते. प्रभासने सोशल मीडियावरती एक पोस्ट शेअर केली ज्यामध्ये प्रभासने बिग बींचे आभार देखील मानले आणि म्हटले की 'माझे स्वप्न खरे झाले'.

Prabhas
Bharti Singh : भारती सिंहला जुळी मुले होणार?

या चित्रपटाच्या सेटवरती अमिताभ बच्चन आणि प्रभास बराच वेळ एकत्र घालवताना दिसतात. शुटिंगनंतर एकत्र खाणे, फिरणे आणि गॉसिप करणे या दोन्ही गोष्टी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये करताना दे दिसून येतात. काही दिवसांपूर्वीच अमिताभ बच्चन यांनी सांगितले होते की, प्रभासने बिग बींसाठी घरी शिजवलेले अन्न आणले होते. जेवणाचे प्रमाण एवढे होते की अमिताभ यांना पाहून आश्चर्य वाटले होते. यावर अमिताभ यांनी त्यांचे आभार देखील मानले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com