नयनतारा-विघ्नेशच्या लग्नाचा टीझर आऊट, या दिवशी OTT वर होणार रिलीज

नयनताराच्या चाहत्यांची प्रतीक्षा अखेर संपली. होय, आता साऊथचे फेम फिल्म स्टार नयनतारा आणि विघ्नेश शिवन यांचा वेडिंग डॉक्युमेंटरी लवकरच OTT प्लॅटफॉर्म Netflix वर प्रदर्शित करण्यात येणार आहे.
Nayanthara And Vignesh Shivan
Nayanthara And Vignesh ShivanDainik Gomantak
Published on
Updated on

नयनताराच्या चाहत्यांची प्रतीक्षा अखेर संपली. होय, आता साऊथचे फेम फिल्म स्टार नयनतारा आणि विघ्नेश शिवन यांचा वेडिंग डॉक्युमेंटरी लवकरच OTT प्लॅटफॉर्म Netflix वर प्रदर्शित करण्यात येणार आहे. नयनतारा आणि विघ्नेश शिवन यांच्या लग्नाच्या डॉक्यूमेंटरी टीझर अलीकडेच या OTT प्लॅटफॉर्मच्या वतीने शेअर करण्यात आला. दोन्ही स्टार्सच्या वेडिंग डॉक्युमेंटरीचे नाव नयनतारा: बियॉन्ड द फेयरीटेल असे आहे. ()

Nayanthara And Vignesh Shivan
Pradip Patwardhan: ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे निधन

टीझरमध्ये नयनतारा-विघ्नेशचा लूक

नेटफ्लिक्सने लग्नाच्या माहितीपटाचा 21 सेकंदांचा टीझर व्हिडिओ रिलीज केला आहे तर या टीझरमध्ये दोन्ही स्टार्सची झलक पाहायला मिळत आहे. टीझरमध्ये नयनतारा म्हणते की, 'माझा फक्त काम करण्यावर विश्वास आहे आणि तुमच्या आजूबाजूला खूप प्रेम आहे ते तुम्हाला मिळत आहे हे जाणून नक्कीच बरे वाटते. त्याच वेळी, तिचे पती, दक्षिण सिनेमाचे दिग्दर्शक विघ्नेश शिवन (Vignesh Shivan) म्हणतात की 'स्त्री म्हणून तिचा स्वभाव आणि चारित्र्य खूप प्रेरणादायी आहे तसेच ती आतून खूप सुंदर आहे. मात्र, डॉक्युमेंट्रीच्या रिलीजच्या तारखेबाबत अद्याप काहीही सांगण्यात आले नाही.

दोघांचा विवाह महाबलीपुरममध्ये झाला

नयनतारा आणि विघ्नेश शिवन यांचा विवाह 9 जून रोजी चेन्नईच्या महाबलीपुरममध्ये एका शानदार सोहळ्यामध्ये झाला.लग्न समारंभातील कोणत्याही प्रकारचे व्हिडिओ आणि फोटो लीक होऊ नयेत यासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था देखील ठेवण्यात आली होती.बॉलिवूड चित्रपटसृष्टीतील शाहरुख खान, रजनीकांत, एआर रहमान, सुरिया, कार्ती, विजय सेतुपती, गौतम वासुदेव मेनन आणि ऍटली यांच्यासह टॉप स्टार्सनी या लग्नसोहळ्याला हजेरी लावली होती.

Nayanthara And Vignesh Shivan
Taapsee Pannu: 'माझ्यासोबत निट बोला'; पापराझींसोबत तूतू-मैंमैं,पाहा व्हिडिओ

लग्नापूर्वी 7 वर्षे डेटिंग

नयनतारा आणि विघ्नेश सिवन यांनी लग्नाआधी 7 वर्षे एकमेकांना डेट केले होते तसेच दोघेही 2015 साली नानुम राउडी पॅडी या डार्क कॉमेडी चित्रपटाच्या सेटवर भेटले होते. विघ्नेश शिवन या चित्रपटाचे दिग्दर्शन करत होते, ज्यामध्ये नयनतारा आणि विजय सेतुपती मुख्य भूमिकेमध्ये होते. या चित्रपटानंतर नयनतारा आणि विघ्नेश एकमेकांच्या प्रेमात पडले आणि तेव्हापासून दोघेही एकमेकांसोबत राहू लागले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com