Nawajuddin Siddiqui: नवाजुद्दीन सिद्दिकीची पत्नी झैनबची पोलिसांकडून चौकशी सुरू, नवाजच्या आईची काय आहे तक्रार?

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीच्या आईने त्याच्या पत्नीविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे
Nawajuddin Siddiqui
Nawajuddin SiddiquiDainik Gomantak

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) हा बॉलिवूडचा एक गुणी अभिनेता समजला जातो. सध्या नवाजुद्दीन सिद्दीकी एका कारणाने चर्चेत आहे. नवाजची आई आणि पत्नी यांच्यातला वाद पोलिस स्टेशनपर्यंत गेला आहे.

नवाजुद्दीन सिद्दीकीची पत्नी जैनब हिची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. नवाजुद्दीनच्या आईच्या तक्रारीनंतर त्याच्या पत्नीला पोलिस स्टेशनमध्ये चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. वादानंतर नवाजुद्दीनच्या आईने झैनबविरोधात ही एफआयआर नोंदवली. या दोघांमध्ये मालमत्तेवरून वाद सुरू आहे.

चित्रपटसृष्टीत आपली क्षमता सिद्ध करणारा अभिनेता सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. वृत्तांवर विश्वास ठेवला तर नवाजुद्दीनची आई महरुनिसा सिद्दीकी यांनी नवाजुद्दीनची पत्नी जैनबविरोधात एफआयआर दाखल केला आहे. 

या एफआयआरच्या आधारे पोलिसांनी महरुनिसा यांची सून म्हणजेच जैनब हिला चौकशीसाठी पोलिस ठाण्यात बोलावले आहे. वादानंतर नवाजुद्दीनच्या आईने झैनबविरोधात ही एफआयआर नोंदवली. या दोघांमध्ये मालमत्तेवरून वाद सुरू आहे.

Nawajuddin Siddiqui
Tu Jhoothi Mai Makkar Trailor: 'तू झूठी मैं मक्कार' चं ट्रेलर रिलीज...चित्रपटाच्या नावाप्रमाणेच ट्रेलरही अतरंगी...

नवाजुद्दीन सिद्दीकीची आई महरुनिसा यांनी मुंबईतील वर्सोवा पोलीस ठाण्यात हा एफआयआर दाखल केला आहे एफआयआरच्या आधारे पोलिसांनी कलम ४५२, ३२३, ५०४ आणि ५०६ अंतर्गत हा गुन्हा दाखल केला आहे. 

झैनबवर आरोप आहे की, ती ज्या बंगल्यात गेली होती तिथे नवाजुद्दीनच्या आईसोबत वाद झाला, या वादानंतर आता ही केस पोलीसांत दाखल केली आहे. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com