Vikram Vedha च्या नावे नवा विक्रम! ‘इतक्या’ देशांमध्ये होणार रिलीज

‘विक्रम वेधा’ ने रिलीजपूर्वीच नवा विक्रम रचला आहे.
Vikram Vedha
Vikram VedhaDainik Gomantak
Published on
Updated on

बॉलिवूडमधील प्रसिध्द अभिनेता ह्रितिक रोशन आणि अभिनेता सैफ अली खान यांचा आगामी चित्रपट ‘विक्रम वेधा’ (Vikram Vedha) सध्या सोशल मिडीयावर चर्चेत आहे. या चित्रपटातून पहिल्यांदाच हृतिक रोशन आणि सैफ अली खान एकत्र दिसणार आहे. ‘विक्रम वेधा’ हा चित्रपट 30 सप्टेंबरला रिलीज होणार आहे. या चित्रपटाच्या रिलीजपूर्वीच या चित्रपटाने नवा विक्रम रचला आहे. सैफ आणि हृतिकचा हा चित्रपट जगभरातील 100हून अधिक देशांमध्ये रिलीज होणार आहे.

भारतासह उत्तर अमेरिका, यूके, मध्य पूर्व ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड सारख्या मोठ्या देशांमध्ये ‘विक्रम वेधा’ एकाच दिवशी रिलीज होणार आहे. याशिवाय हा चित्रपट युरोपातील 22 आणि आफ्रिकेतील 27 देशांमध्ये देखील रिलीज होणार आहे. यासह जपान, रशिया, इस्रायल, लॅटिन अमेरिका यांसारख्या देशांमध्येही ‘विक्रम वेधा’ रिलीज केला जाणार आहे.

‘विक्रम वेधा’ हा याच नावाच्या साऊथ चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटामध्ये सैफ अली खान (Saif Ali Khan)आणि ऋतिक रोशन (Hrithik Roshan) हे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. विक्रम वेधा चित्रपटाच्या तमिळ व्हर्जनमध्ये ‘विक्रम’ ही भूमिका आर. माधवननं साकारली होती, तर ‘वेधा’ ही भूमिका विजय सेतुपतीनं (Vijay Sethupathi) साकारली होती. या चित्रपटाला प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला होता.

Vikram Vedha
PM Narendra Modi B'Day: अक्षय कुमार-कंगना रणौतसह बॉलिवूड स्टार्सनी दिल्या PM मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा

पुष्कर आणि गायत्री यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या 'विक्रम वेधा'चे पोस्टर आणि ट्रेलर या चित्रपटाबाबतचे कुतूहल वाढवणारे आहेत. या चित्रपटात भरपूर अ‍ॅक्शन पाहायला मिळणार असल्याचे ट्रेलरमधून दिसते आहे.

ट्रेलरनेही रचला विक्रम!

'विक्रम वेधा'च्या ट्रेलरला सोशल मीडियावर उत्तम प्रतिसाद मिळत आहे. अल्पावधीतच ट्रेलरने सोशल मीडियावर धुमाकूळ (Social Media) घातला होता. या ट्रेलरला अवघ्या पाच तासांत पाच मिलियन व्ह्यूज मिळाले होते. 'विक्रम वेधा' या चित्रपटात सैफ अली खान ‘विक्रम’च्या भूमिकेत दिसणार आहे. तर, हृतिक रोशन ‘वेधा’च्या भूमिकेत दिसणार आहे. हृतिक रोशन आणि सैफ अली खानचा या चित्रपटातील (Movie) लूक देखील प्रेक्षकांना आजत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com