काविळीचे निमित्त ठरले अन् या गायकाने 40 व्या वर्षी घेतला जगाचा निरोप...संगीतसृष्टीवर शोककळा...

हरियाणवी गायक राजू पंजाबी यांचे हरियाणातील रुग्णालयात निधन झाले. राजूने त्याचे शेवटचे गाणे 'आपसे मिलके यारा हमको अच्छा लगा था' काही दिवसांपूर्वी रिलीज केले होते.
Raju Punjabi
Raju PunjabiDainik Gomantak
Published on
Updated on

Singer Raju Punjabi Passes away : संगीतसृष्टीतून सध्या एक वाईट बातमी समोर आली आहे. हरियाणवी गायक राजू पंजाबी याचे वयाच्या 40 व्या वर्षी हरियाणातील रुग्णालयात निधन झाले. इंडिया टीव्हीच्या वृत्तानुसार, त्याला काही काळ हरियाणातील हिस्सार येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि काविळीसाठी त्यांच्यावर उपचार सुरू होते.

काविळीचा त्रास

अहवालानुसार, प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. मात्र, गायकाची प्रकृती खालावल्याने त्यांना पुन्हा दाखल करण्यात आले. गायक केडी देसी रॉकने हॉस्पिटलच्या बेडवरून राजूचा फोटो शेअर केला आणि लिहिले, “राजू वापस आजा (राजू परत या).”

युजर्स लिहितात

एका इंस्टाग्राम युजरने म्हटले, "आज आमचा प्रिय भाऊ राजू पंजाबी आमच्यात नाही. आमच्या भावाला शांती लाभो. ओम शांती." "आम्ही तुम्हाला मिस करू," दुसऱ्या एका युजरने लिहिले., "आम्ही सर्वशक्तिमान देवाकडे प्रार्थना करतो की त्यांच्या आत्म्याला देवाने आपल्या चरणी स्थान द्यावे. ओम शांती."

राजूचे शेवटचे गाणे

काही दिवसांपूर्वी राजूने आपसे मिलके यारा हमको अच्छा लगा था हे शेवटचे गाणे रिलीज केले होते. त्याची शेवटची इंस्टाग्राम पोस्ट देखील त्याच्या गाण्याबद्दल आहे. राजूने 20 ऑगस्ट रोजी एक व्हिडिओ कोलाज शेअर केला होता."

राजू पंजाबी हा आच्छा लगे से, देसी देसी, तू चीज लाजवाब, लास्ट पेग आणि भांग मेरे यारा ने यांसारख्या गाण्यांसाठी ओळखला जातो. त्याने सपना चौधरीसोबत एका प्रोजेक्टवर काम केले होते.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com