Cannibal Holocaust : बापरे ! या चित्रपटात खराखुरा बलात्कार दाखवला होता? आजही चित्रपटावर बंदी आहे

Cannibal Holocaust या चित्रपटाने जगभरातल्या चित्रपट रसिकांच्या भुवया उंचावल्या होत्या.
Cannibal Holocaust
Cannibal HolocaustDainik Gomantak

हॉलिवूड...चित्रपटांचा अवाढव्य उद्योग आणि प्रचंंड मोठी बजेट असणारे सिनेमे. हॉलिवूडची ओळख अशीच करुन द्यावी लागेल. हॉलीवूडचे असे कित्येक चित्रपट आहेत ज्यांना विसरणं प्रेक्षकांसाठी अशक्य आहे. पण काही असेही चित्रपट असतात जे वेगळ्याच कारणासाठी अविस्मरणीय असतात.

असाच एक इटालियन चित्रपट ज्याने जगभरात खळबळ माजवली. प्राण्यांच्या मृत्यूपासून ते खऱ्याखुऱ्या बलात्कारापर्यंत कुठल्याच चित्रपटात जे घडलं नाही ते 'कॅनिबल होलोकॉस्ट' या हॉलिवूडपटात घडलं. चित्रपटासाठी दिग्दर्शकाविरुद्ध अनेक महिने खटला चालला होता.

अनेक सिनेमे असे असतात की ते एकदाच बनले तरी वर्षानुवर्षे प्रेक्षकांच्या हृदयात आपली छाप सोडतात. या चित्रपटांमध्ये काही ना काही घडते, जे लक्षात राहते किंवा धक्कादायक घटना बनते. आपल्यापैकी कित्येकांनी अनेक हॉरर चित्रपट पाहिले असतील, परंतु असा क्वचितच एखादा चित्रपट असेल, ज्यात अशा विचित्र गोष्टींच्या आठवणींचा साठा असेल.

 असाच एक चित्रपट म्हणजे कॅनिबल होलोकॉस्ट. आज चर्चा करूया या चित्रपटाबद्दल. हा एक असा चित्रपट होता ज्यावर जगभरात बंदी घालण्यात आली होती. या चित्रपटात अशा अनेक गोष्टी घडल्या ज्या चित्रपटाच्या इतिहासात कोरल्या जातील.

Cannibal Holocaust
Miss World 2021 चा किताब का जिंकू शकली नाही भारताची Manasa Varanasi, कुठे चूक झाली?

'कॅनिबल होलोकॉस्ट' हा हॉरर इटालियन चित्रपट बलात्कारापासून ते खुनाच्या आरोपांपर्यंत वादात सापडला होता. 1980 च्या दशकात आजच्या तुलनेत इटालियन हॉरर चित्रपट जगभरात चालत होते.

युरोपियन राष्ट्रातून डझनभर भयपट त्याकाळात आले होते . डारियो अर्जेंटो आणि लुसिओ फुल्सी सारख्या दिग्दर्शकांचे चित्रपट त्या काळात प्रचंड लोकप्रिय झाले होते. पण हा इटालियन चित्रपट सर्वांत वेगळा आणि जगाला हादरवुन सोडणारा ठरला.

 'कॅनिबल होलोकॉस्ट' 1980 मध्ये रिलीज झाला होता आणि त्याचे दिग्दर्शन रुगेरो देवाटो यांनी केले होते. 

रॉबर्ट कर्मन यांनी अॅडल्ट सिनेमा इंडस्ट्रीत करिअर केल्यानंतर सामान्य चित्रपटात काम करण्यास सुरुवात केली. आणि एक वादग्रस्त इतिहास घडला. कॅनिबल होलोकॉस्ट हा अनेक कारणांमुळे बनलेला सर्वात वादग्रस्त भयपट चित्रपटांपैकी एक आहे.

या चित्रपटात इतकी भयंकर सिन्स आणि क्रूरता दाखवण्यात आली होती की, लोकांना तो पाहणे शक्य झाले नाही. त्यामुळे रिलीज होण्यापूर्वीच न्यायालयाने त्यावर बंदी घातली. ही बंदी अजूनही अनेक देशांमध्ये लागू आहे.

 या चित्रपटात हिंसाचाराची वेदनादायक दृश्ये दाखवण्यात आली होती जेणेकरून ती खरी वाटावी. त्यासाठी अनेक प्राण्यांना मारण्यासाठी दिग्दर्शकाने कलाकार मिळवले. चित्रपटात खरे वाटावे यासाठी प्रत्यक्षात बलात्काराची खरी दृश्येही दाखवण्यात आली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com