Bobby Deol: बॉलीवूडच्या कलाकारांची जितकी त्यांच्या चित्रपटामुळे चर्चा असते तितकीच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळेदेखील असते. कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्यात काय घडतं हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असल्याचे वेळोवेळी पाहायला मिळत असते. आता बॉबी देओलने एका मुलाखतीदरम्यान त्याच्याबद्दल सांगितलेला किस्सा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
बॉबी देओलच्या वडील म्हणजेच धर्मेंद्र यांनी दुसरे लग्न केले होते, त्यावेळी बॉबी देओल खूप बंडखोर झाले होते अशा आशयाचे वक्तव्य त्याने एका मुलाखतीदरम्यान केले होते. त्याने स्वतःला त्याच्या कुटुंबापासून तोडून टाकले. वडीलांनी दुसरे लग्न केले याचा त्यांच्या मनात राग होता.
बॉबीने सांगितले होते की, जेव्हा तो १८ वर्षांचा झाला तेव्हा तो बंडखोर झाला आणि कुटुंबातील सर्वांपासून दूर राहू लागला. बॉबी म्हणाला होता, 'मी पहिल्यांदा डिस्कोमध्ये गेलो होतो तेव्हा मी १८ वर्षांचा होतो. त्यानंतर मला माझ्या आत एक विचित्र बंडखोरी जाणवू लागली.
अनेक वर्षे मी माझ्या पालकांनी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीकडे दुर्लक्ष केले. वडिलांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करायचो. जरी ते माझ्या भल्यासाठी सांगत असले तरी त्यांच्याकडे मी लक्ष द्यायचो नाही. मी ठरवले होते की मला त्यांचे ऐकायचे नाही. तो काळ होता जेव्हा माझे आणि माझ्या वडिलांचे नाते सर्वात वाईट टप्प्यातून जात होते.
देओल कुटुंबातील सर्व तणाव तेव्हापासून सुरू झाला जेव्हा धर्मेंद्र यांनी हेमा मालिनीसोबत दुसरे लग्न केले. धर्मेंद्र यांचे पहिले लग्न त्यांच्या कुटुंबीयांच्या संमतीने प्रकाश कौरसोबत झाले होते आणि त्यांना सनी देओल, बॉबी देओल, अजिता देओल आणि विजेता देओल ही चार मुले होती. धर्मेंद्र यांनी हेमा मालिनी यांच्याशी लग्न केले आणि या लग्नासाठी त्यांनी प्रकाश कौर यांना घटस्फोट दिला नाही. दोन्ही लग्नांना मान्यता मिळावी यासाठी त्यांचा धर्म बदलून इस्लाम धर्म स्वीकारला.
आता मात्र सर्व हेवेदावे, राग विसरुन देओल कुटुंबिय एकत्र आलेली पाहायला मिळते. बॉबी आणि सनी देओल आपल्या वडीलांबरोबर चांगला वेळ घालवताना दिसतात.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.