Raj Kapoor: आर.के स्टुडिओनंतर आता राज कपूर यांची ही प्रॉपर्टीही विकली जाणार...

बॉलिवूडचे दिवंगत दिग्गज दिग्दर्शक, अभिनेते राज कपूर यांची प्रॉपर्टी विकली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे
Raj Kapoor
Raj Kapoor Dainik Gomantak
Published on
Updated on

बॉलिवूडचे शोमॅन अर्थात राज कपूर यांचं हिंदी चित्रपटसृष्टीला एक वेगळं योगदान आहे.त्यांच्या चित्रपटांनी मनोरंजनासोबत मानवी मुल्यांची शिकवण प्रेक्षकांना दिली. आजही त्यांचं नाव घेतल्याशिवाय चित्रपटसृष्टीचा इतिहास पूर्ण होत नाही.  त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीला एकापेक्षा एक चित्रपट दिले आहेत. राज कपूर आज आपल्यात नसले तरी त्यांच्याशी निगडित गोष्टी आजही बोलल्या जातात.

 राज कपूरबाबत एक बातमी येत आहे की, आरके स्टुडिओनंतर आता त्यांचा चेंबूरचा बंगलाही विकला गेला आहे. हा बंगला अनेक एकरांमध्ये पसरलेला आहे. याआधी मे 2019 मध्ये राज कपूर यांच्या आठवणींचा महत्त्वाचा भाग असलेला आरके स्टुडिओही विकला गेला होता.

 त्यावर कंपनी रिअल इस्टेट प्रकल्प उभारणार आहे. राज कपूर यांचा हा बंगला देवनार फार्म रोडवरील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सच्या शेजारी आहे. हा करार किती झाला, याचा खुलासा अद्याप झालेला नाही. हा बंगला राज कपूर यांच्या कुटुंबीयांकडून खरेदी करण्यात आल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. 

Raj Kapoor
S.S Rajamauli: "भीमचं पात्र मुस्लीम असल्याचं दाखवलं तेव्हा थिएटर्स जाळण्याची धमकी दिली"! राजामौलींची धक्कादायक माहिती

प्रॉपर्टीज लिमिटेड कंपनी स्वतः. आरके स्टुडिओची मालकी ऋषी कपूर, रणधीर कपूर आणि राजीव कपूर यांच्याकडे होती. आरके स्टुडिओ 33 हजार स्क्वेअर मीटरमध्ये पसरलेला आहे. 

आरके स्टुडिओ राज कपूर यांनी 1948 मध्ये उभा केला होता. होळी आणि गणेश उत्सवानिमित्त येथे भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते, परंतु त्यानंतर या मालमत्तेचा काही भाग आगीत जळून खाक झाला, त्यामुळे कपूर कुटुंबाने ते विकण्याचा निर्णय घेतला. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com