Al-Pacino - Robert De Niro : जेव्हा 79 व्या बाप बनलेला अभिनेता 83 व्या वर्षी बाबा बनणाऱ्या दुसऱ्या अभिनेत्याला शुभेच्छा देतो...

हॉलीवूड अभिनेता रॉबर्ट डी निरोने अल पचीनो 83 वर्षी बाप बनू इच्छिणाऱ्या अभिनेत्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
Al-Pacino - Robert De Niro
Al-Pacino - Robert De NiroDainik Gomantak
Published on
Updated on

ज्येष्ठ अभिनेते रॉबर्ट डी नीरो नुकतेच वयाच्या 79 वर्षी बाबा बनले आहेत. मे महिन्यात गर्लफ्रेंड टिफनी चेनसह आपल्या 7व्या मुलाचे स्वागत केलं आहे. नुकत्याच टुडे या शोमध्ये दिलेल्या ताज्या मुलाखतीत डी निरोंनी त्यांचा सह-कलाकार आणि मित्र अभिनेता अल पचिनोचं अभिनंदन केलं आहे.

त्याचं कारण म्हणजे 83 व्या वर्षांचे अलपचिनो काही दिवसांतच बाबा बनणार आहेत.आपली प्रेयसी चित्रपट निर्माता नूर यांच्यासोबत अलपचिनो आपल्या चौथ्या अपत्याची वाट पाहात आहेत 

मला खूप आनंद झाला !

जेव्हा अभिनेते रॉबर्ट डी निरो यांना त्यांच्या नुकत्याच बाबा बनण्याच्या आनंदाबद्दल विचारले तेव्हा ते म्हणाले, "आजच्या दिवसात आणि टप्प्यावर? ऐका, अल पचिनो बाबा बनणार आहे हे नुकतेच मला कळले आहे , मला काल सकाळी सांगण्यात आले.

तो माझ्यापेक्षा काही वर्षांनी मोठा आहे. देव त्याला आशीर्वाद देईल. मला या बातमीचा खूप आनंद झाला. ” या बातमीने मला "खूप छान वाटते. छान वाटते असंही रॉबर्ट डी निरो म्हणाले."

रॉबर्ट डी निरोच्या मुलीचे नाव

रॉबर्ट डी नीरो यांनी आपल्या मुलीचे नाव 'जिया व्हर्जिनिया चेन डी नीरो' असं ठेवलं आहे, बाबा बनण्याबद्दल बोलताना डी निरो म्हणाले, "माझ्यामध्ये काही गोष्टींबद्दल जागरूकता आहे. जेव्हा तुम्ही मोठे असता तेव्हा तुम्हाला जीवनातील काही गोष्टींची जगण्यातल्या गतीशीलतेची जाणीव असते.

यात सर्व काही येतं कौटुंबिक जवळीकताही येते. ...तुम्ही काही गोष्टी शिकणे टाळू शकत नाही आणि मग तुम्ही त्या कशा हाताळू शकता, त्यांना कसे करू शकता या आणि अशा बऱ्याच गोष्टी मी शिकलो."

अल पचिनो आठवतात का?

अभिनेते अल पचिनो यांच्या फिल्मोग्राफीला परिचयाची गरज नाही पण ज्यांना त्याची गरज आहे त्यांच्यासाठी तो क्लासिक द गॉडफादर मालिकेचा स्टार आहे हे सांगणं पुरेसं आहे. त्यांनी स्कारफेस, सेन्ट ऑफ अ वुमन, हीट, सर्पिको, सी ऑफ लव्ह, द डेव्हिल्स अॅडव्होकेट यासारख्या गाजलेल्या आणि माईल स्टोन म्हणता येईल अशा चित्रपटांमध्ये काम केले आहे. 

इनसाइडर, ...आणि जस्टिस फॉर ऑल, कार्लिटोचा मार्ग, डॉनी ब्रास्को, ओशियन्स थर्टीन , इतर अनेक चित्रपटांचीही नावं यात घेता येतील. अलिकडच्या वर्षांत, या अभिनेत्याने वन्स अपॉन अ टाइम इन हॉलीवूड, द आयरिशमन, हाऊस ऑफ गुच्ची, द पायरेट्स ऑफ सोमालिया, डॅनी कॉलिन्स यासारख्या चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत .

Al-Pacino - Robert De Niro
Pranit Bhatt: शकुनी मामा कुठेय? इंजिनिअरची नोकरी सोडून अभिनेता बनलेला प्रणीत भट्ट..

रॉबर्ट डी निरो यांचे हे चित्रपट

रॉबर्ट डी नीरोच्या फिल्म क्रेडिट्समध्ये टॅक्सी ड्रायव्हर, रॅगिंग बुल, गुडफेलास, जोकर, वन्स अपॉन अ टाइम इन अमेरिका, अवेकनिंग्ज, द इंटर्न, द अनटचेबल्स, हीट, द डीअर हंटर, केप फिअर, अमेरिकन हसल यासारख्या रत्नांचा समावेश आहे .

रॉबर्ट डी निरो आणि अपचिनो यांच्यातल्या इतकी वर्षे जुन्या मैत्रीची ओळख यानिमित्ताने सर्वांना झाली. ही शुभेच्छा 79 व्या वर्षी बाबा झालेल्या अभिनेत्याने 83 व्या वर्षी बाबा बनू इच्छिणाऱ्या अल पचिनो यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com