Creative Minds of Tomorrow मध्ये 'हा' ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट, पाहा विजेत्यांची संपूर्ण यादी..

IFFI 2024: ‘क्रिएटिव्ह माईंडस ऑफ टुमारो’ (सीएमओटी) हा भारताच्या सर्वात आश्वासक तरुण चित्रपट निर्मात्यांचा शोध आणि संगोपन यांसाठीचा प्रमुख मंच म्हणून उदयाला आला आहे.
Creative Minds of Tomorrow IFFI 2024
Creative Minds of Tomorrow IFFI 2024Dainik Gomantak
Published on
Updated on

Creative Minds of Tomorrow Full Result IFFI 2024

पणजी: युवा वर्गाचा चैतन्याने भरलेला जोश, उत्साहपूर्ण वातावरण आणि अथक तरीही अविस्मरणीय अशा ४८ तासांची चुरस असा होता इफ्फीतील ‘क्रिएटिव्ह माईंडस ऑफ टुमारो’ या उपक्रमाच्या समारोप सोहोळ्यातील नजारा. मॅकिनेझ पॅलेसमध्‍ये तो झाला.

‘क्रिएटिव्ह माईंडस ऑफ टुमारो’ (सीएमओटी) हा भारताच्या सर्वात आश्वासक तरुण चित्रपट निर्मात्यांचा शोध आणि संगोपन यांसाठीचा प्रमुख मंच म्हणून उदयाला आला आहे. यावर्षी या कार्यक्रमाच्या आवाक्याचा विस्तार करत त्यामध्ये चित्रपट निर्मिती प्रक्रियेतील १३ शाखांमधील १०० युवा प्रतिभावंतांचा समावेश करून एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण केला आहे.

गेल्या वर्षी याच उपक्रमाअंतर्गत १० कलाप्रकारांमध्ये ७५ सहभागींनी आपले कौशल्य सादर केले होते, त्यात यावर्षी लक्षणीय वाढ दिसून आली. या उपक्रमाला यावर्षी भरघोस प्रतिसाद मिळाला. यासाठी देशभरातून चित्रपटांशी संबंधित १३ प्रकारांमध्ये आपापली प्रतिभा सादर करणाऱ्या सुमारे १०७० कलाकारांच्या प्रवेशिका आल्या होत्या.

४८ तासांमध्ये चित्रपट निर्मिती करण्याचे आव्हान हे यावर्षीच्या कार्यक्रमाचे खास आकर्षण होते. यासाठी प्रत्येकी २० सदस्य असलेल्या पाच संघांनी ‘तंत्रज्ञानाच्या युगातील नातेसंबंध’ या विषयावर आधारित लघुपटांची निर्मिती केली. २१ ते २३ नोव्हेंबर या कालावधीत गोव्यात पणजीपासून ४ किलोमीटरच्या परिघात वेगवेगळ्या १२ ठिकाणी ही स्‍पर्धा उत्‍साहात पार पडली.

Creative Minds of Tomorrow IFFI 2024
IFFI 2024: 'पौराणिक कथा मिथक नाहीत, ती तर आपली संस्कृती'; ‘महावतार नरसिंह’च्या दिग्दर्शकाने जागवला परंपरांचा अभिमान

सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला ‘गुल्लू’

सीएमओटीमध्ये ४८ तासांत चित्रपट निर्मितीचे आव्हान यशस्वीपणे पूर्ण करणारे विजेते पुढीलप्रमाणे : सर्वोत्कृष्ट चित्रपट : गुल्लू, सर्वोत्कृष्ट चित्रपट (उपविजेता) : वुई हियर द सेम म्युझिक. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : आर्शली जोस (गुल्लू). सर्वोत्कृष्ट कथा : अधिराज बो (लव्हपिक्स सबस्क्रिप्शन). सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : विशाखा नायर (लव्हपिक्स सबस्क्रिप्शन). सर्वोत्कृष्ट अभिनेता : पुष्पेंद्र कुमार (गुल्लू).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com