सावंतवाडीतील फुलपाखरांचे गाव; 180 हून विविध प्रकारची फुलपाखरे पाहण्याची संधी

20 ते 23 ऑक्टोबर दरम्यान होणारा महोत्सव निसर्गप्रेमींसह पर्यटकांसाठी विविध प्रकारच्या फुलपाखरांचा अभ्यास करण्यासाठी सुवर्णसंधी आहे
Parpoli Sawantwadi
Parpoli Sawantwadi

Parpoli Sawantwadi: फुलपाखरांचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पारपोली गावात फुलपाखरु महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सावंतवाडी वनविभाग आणि पारपोली संयुक्त वन व्यवस्थापन समिती यांच्यावतीने आयोजन करण्यात आलेल्या या महोत्सवाचे महाराष्ट्राचे बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते आज (शुक्रवार) उद्घाटन केले.

'पारपोली येथे फुलपाखरांच्या वाढीसाठी अतिशय वैशिष्ट्यपूर्ण सूक्ष्म असे वातावरण तसेच फुलपाखरांचे अन्न असलेली विविध प्रकारची फुले उपलब्ध आहेत.'

'त्यामुळे सुमारे 180 हून अधिक विविध प्रकारची फुलपाखरे या गावात आढळतात. 20 ते 23 ऑक्टोबर दरम्यान होणारा महोत्सव निसर्गप्रेमींसह पर्यटकांसाठी विविध प्रकारच्या फुलपाखरांचा अभ्यास करण्यासाठी सुवर्णसंधी आहे,' अशी भावना यावेळी व्यक्त केली.

सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण जिल्हा आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करेन, असे आश्वासन त्यांनी उपस्थितांना दिले.

पारपोली सारख्या छोट्याशा गावासाठी सार्वजनिक विभागाच्या माध्यमातून 80 लाखाचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. यामध्ये 50 लाखाचे दोन साकव, 35 लाखाचे समाज मंदिर, 10 लाखाचे ओपन जिम, 10 लाखाचे जाधववाडी येथे रस्ता, 06 लाख शाळा दुरुस्तीसाठी निधी देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दिपक केसरकर, जिल्हाधिकारी किशोर तावडे, कोल्हापूर वनवृत्त मुख्यवनसंरक्षक आर. एस. रमानुजम, भाजपचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे अध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी आमदार राजन तेली, संदिप गावडे, सरपंच कृष्णा नाईक, उपसरपंच गुरव, भाजपचे विभागाचे शक्तीकेंद्र प्रमुख ज्ञानेश परब, बुथप्रमुख विजय गावकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com