Old Pension Scheme : संप अखेर मागे, महाराष्ट्रातील संपकरी कर्मचारी उद्यापासून कामावर रुजू होणार

संपाबाबात सरकारची खेळी यशस्वी ठरली आहे.
Old Pension Scheme
Old Pension SchemeDainik Gomantak
Published on
Updated on

Maharashtra OPS Strike सरकारी कर्माचाऱ्यांनी जुन्या पेन्शनसाठी पुकारलेल्या संपाबाबत मोठी अपडेट समोर येतेय. सरकारी कर्मचाऱ्यांनी संप अखेर मागे घेतला आहे. याबाबत सरकारची खेळी यशस्वी ठरली आहे.

राजपत्रित अधिकाऱ्यांनी या संपाबाबात महत्वाचा निर्णय घेतला होता. यानंतर सर्वच कर्मचाऱ्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यासोबत झालेल्या बैठकीत यशस्वी तोडगा निघाल्याने आता संपात सहभागी न होण्याची भूमिका महासंघानं घेतला.

गेल्या सात दिवसांपासून संपाबाबत सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरु होती. कर्मचारी आपला संप मागे घेण्यासाठी तयार नव्हते. मध्यंतरी या कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झालेली. पण तरीही कर्मचाऱ्यांनी माघार घेतली नाही. पण आजच्या मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला.

राज्य मध्यवर्ती कर्मचारी संघटेनेचे सरचिटणीस विश्वास काटकर यांनी संप मागे घेण्याबाबत आपली भूमिका मांडलीय. काटकर म्हणाले “आमची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत यशस्वी चर्चा झाली.

शासनाने या विषयावर गेल्या सात दिवसात वेगवेगळी अॅक्शन घेतली आहे. आज मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं की, आम्ही या विषयाचा गंभीरपणे विचार करत आहोत. या विषयाची माहिती मिळवण्यासाठी आम्ही एक समिती नेमलेली आहे."

Old Pension Scheme
Mahesh Manjrekar: 'वेडात मराठे वीर दौडले सात' चित्रपटाच्या शूटिंगवेळी झाला मोठा अपघात

संपाचा सर्वसामान्यांना फटका:-

सरकारी कर्मचा-यांनी पुकारलेल्या संपाचा सर्वत्र परिणाम दिसून आलाय. सामान्यांच्या अनेक कामांना खीळ बसलेली आहे. विशेषत: ग्रामीण भागात तहसील कार्यालयामध्ये कर्मचारी नसल्याने सर्वत्र शुकशुकाट दिसतोय.

तसेच संपाचा परिणाम आरोग्यसेवेवर देखील पहायला मिळाला. अनेक सरकारी रुग्णालयांमध्ये कर्मचारी उपस्थित नसल्याने उपचारासाठी आलेल्या रुग्णांचे हाल झाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com