Pandharpur: गुढीपाडव्यापासून विठुरायाचे पदस्पर्श दर्शन सुरु

विठ्ठल भक्तांसाठी आनंदाची बातमी! गुढीपाडव्यापासून विठूरायाच्या पायावरील दर्शन सुरु होणार आहे.
Pandharpur
PandharpurDainik Gomantak

कोरोना संसर्गामुळे गेले दोन वर्ष विठुरायाची बंद असलेली पदस्पर्श दर्शन येत्या गुढीपाडव्याच्या शुभ (Gudi Padwa) हूर्तावर सुरू होणार आहे. यामुळे गेल्या दोन वर्षापासून आर्थक झळ सोसणाऱ्या लहान व्यापऱ्यांना दिलासा मिळाला आहे. कोरोना विषाणूचे (Corona) वाढते संकट लक्षात घेता 17 मार्च 2020 पासून विठ्ठल मंदिर बंद करण्यात आले होते. यानंतर मंदिर खुले झाले तरी कोरोना विषाणूच्या निर्बंधामुळे विठुरायाचे दुरुच दर्शन घ्यावे लागत होते.

कोरोना विषाणूचे (Corona) संकट कमी झाल्याने मंदिर समिती आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यात झालेल्या चर्चेनुसार सरकार विठूरायाच्या पायावरील दर्शन सुरु करणार आहेत. यानंतर मंदिर समिती सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी आज होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णयानंतर 1 एप्रिलपासून विठुरायाचे पायावरील दर्शन सुरू होणार असे सांगितले आहे.

Pandharpur
CET 2022: महाराष्ट्र CET 2022 परिक्षेचे वेळापत्रक जाहीर

दरम्यान, या निर्णयामुळे विठ्ठल भक्त आणि लहान व्यापरांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना नियमानुसार मंदिरात तुळशीहार, फुले, प्रसादावर बंदी होती. यामुळे अनेक लहान व्यापारांवर गेली दोन वर्षे उपाशी राहण्याची वेळ आली होती. पण आता पुन्हा विठुरायाचे पायावर दर्शन सुरु झाल्यावर भक्तांना विठुरायाला अर्पण करण्यासाठी हार, फुले, प्रसाद आत घेऊन जाता येणार आहे. यामुळे या शेकडो लहान व्यापाऱ्यांची उपासमार बंद होणार असल्याने या व्यापाऱ्यांमध्येही उत्साहाचं वातावरण आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com