Maharashtra Budget 2023: महाराष्ट्राचे आज 'महाबजेट', शिंदे-फडणवीस सरकारचा पहिला अर्थसंकल्प

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर सादर होणाऱ्या शिंदे-फडणवीस सरकारच्या पहिल्याच अर्थसंकल्पाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
Eknath Shinde-Devendra Fadnavis
Eknath Shinde-Devendra Fadnavis Dainik Gomantak

Maharashtra Budget 2023: महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर आज ते पहिला अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2023) सादर करणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अर्थ खात्याचा भार असल्याने ते पहिल्यांदाच अर्थसंकल्प मांडणार आहे.

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर सादर होणाऱ्या शिंदे-फडणवीस सरकारच्या पहिल्याच अर्थसंकल्पाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

2022-23 च्या पुर्वानुमानानुसार राज्याच्या आर्थिक विकासदरात 6.8 टक्क्यांची वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात आली असली तरी, महाराष्ट्र विकासाचा दर देशाच्या विकास दरपेक्षा कमी आहे.

तसेच, 2022-23 मध्ये राज्यावर 6 लाख 49 हजार 699 कोटी कर्ज अपेक्षित आहे. राज्यावर कर्जाच्या व्याजाचा बोजा 46 हजार कोटी रुपये आहे.

याकडे असेल सर्वांचे लक्ष

शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadanvis Government) कृषी पायाभूत सुविधा, कापसाला भाव, नाफेड केंद्र सुरू करणे, वीज, ऊस कारखाने, शेत रस्ते, पीकविमा, कर्ज, अनुदान, बियाणे याला किती प्राधान्य देते याकडे बळीराजाचे लक्ष असेल.

दरम्यान, या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधा, शहरी भागांसाठी विविध प्रकल्प, कृषी क्षेत्रासाठी भरीव तरतूद, शेतकऱ्यांसाठी पॅकेज आदीबाबतच्या मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे. तसेच, रस्ते, पूल, सिंचन प्रकल्प यांसह अन्य कामांसाठी या अर्थसंकल्पामध्ये भरीव तरतूद केली जाण्याचे संकेत आहेत. 

राज्यातील आगामी निवडणुका पाहता यंदाच्या अर्थसंकल्पात मोठ्या शहरांसाठी जास्तीची आर्थिक तरतूद करण्याला सरकार प्राधान्य देऊ शकतं.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com