Maharashtra Budget 2023: महाराष्ट्राच्या बजेटमधील काही महत्वाच्या घोषणा, वाचा एका क्लिकवर

राज्यातील एकनाथ शिंदे यांच्या सरकारचा पहिला अर्थसंकल्प आज अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडला आहे.
Maharashtra Budget 2023
Maharashtra Budget 2023Dainik Gomantak
Published on
Updated on

Maharashtra Budget 2023: राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचा 2023-24  या वर्षाकरता अर्थसंकल्प सादर केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा हा पहिला अर्थसंकल्प आहे. तर देवेंद्र फडणवीस यांनी अर्थमंत्री म्हणून मांडलेला पहिलाच अर्थसंकल्प होय. संत तुकारामांच्या ओवीचा उल्लेख करत अर्थसंकल्प वाचानास सुरूवात केली होती. या अर्थसंकल्पीय भाषणात देवेंद्र फडणवीस यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत.

  • देवेंद्र फडणवीस यांच्या बजेटमधील 10 मोठ्या घोषणा

  1. केंद्राप्रमाणे शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महा सन्मान निधी, शेतकऱ्यांच्या खात्यावर 6 हजार रुपये भरणार

  2. महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना आता केवळ 1 रुपयांत पीकविमा

  3. धनगर समाजाला 1000 कोटी रुपये, महामंडळामार्फत 10 हजार कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध

  4. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकाचे हे 350 वे वर्ष. या महोत्सवासाठी 350 कोटी रुपये

  5. 5000 गावांमध्ये सुरु करणार जलयुक्त शिवार 2.0 

Maharashtra Budget 2023
Mumbai: खोटी आई, खोटे मृत्यूचे प्रमाणपत्र... LIC कडे मागितला 2 कोटी रुपयांचा विमा

6. मुलींसाठी लेक लाडकी योजना,  जन्मानंतर मुलीला 5000 रुपये, - पहिलीत 4000 रुपये, सहावीत 6000 रुपये, अकरावीत 8000 रुपये

7. मुलगी 18 वर्षांची झाल्यावर 75,000 रुपये

8. आशा स्वयंसेविकांचे मानधन 3500 वरुन 5000 रुपये

9. महात्मा ज्योतिराव फुले जनारोग्य योजनेत, आता 5 लाखांपर्यंत उपचार करता येणार

10. संजय गांधी निराधार/श्रावणबाळ योजनेत अर्थसहाय्य आता 1000 हून 1500 रुपये

11. महिलांना एसटी प्रवासात, सरसकट 50 टक्के सूट

12. मुंबई-गोवा शक्तूपीठ महामार्गाचा अहवाल तयार

13. मच्छीमारांसाठी २६९ कोटींची तरतुद

14. मुंबईच्या सुशोभिकरणासाठी 1729 कोटी रुपये

15. विद्यार्थ्यांना आता मिळणार भरीव शिष्यवृत्तीमध्ये मोठी वाढ, पाचवी ते सातवच्या विद्यार्थ्यांना 1000 वरुन 5000 रुपये तर आठवी ते दहावीच्या 1500 वरुन 7500 रुपये, विद्यार्थ्यांना गणवेशही मोफत

16. शिक्षणसेवकांना भरघोस मानधन, सरासरी 10 हजार रुपयांची वाढ

-17. विद्यापीठे/ शैक्षणिक संस्थांना 500 कोटी रुपये अनुदान

18. राज्यात 14 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांची बांधकामे

19. नागपूर येथे 1000 एकरावर लॉजिस्टिक हब

20. खेळाडूंची कामगिरी उंचावण्यासाठी मिशन लक्षवेध, बालेवाडी पुणे येथे स्पोर्टस सायन्स सेंटर उभारणार

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com