Mumbai: खोटी आई, खोटे मृत्यूचे प्रमाणपत्र... LIC कडे मागितला 2 कोटी रुपयांचा विमा

अटक करण्यात आलेल्या एका व्यक्तीची आई असल्याचे भासवत महिलेने एप्रिल 2015 मध्ये त्याच्या नावावर पॉलिसी घेतली होती.
 LIC
LICDainik Gomantak
Published on
Updated on

बनावट मृत्यू प्रमाणपत्र सादर करून दोन कोटी रुपयांच्या विमा रकमेचा दावा करून, भारतीय आयुर्विमा महामंडळाची (LIC) फसवणूक करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. मुंबईच्या शिवाजी पार्क पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

अटक करण्यात आलेल्या एका व्यक्तीची आई असल्याचे भासवत महिलेने एप्रिल 2015 मध्ये त्याच्या नावावर पॉलिसी घेतली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, महिलेने मार्च 2017 मध्ये LIC कडे अर्ज सादर करून 2 कोटी रुपये विम्याचा दावा केला. डिसेंबर 2016 मध्ये पुण्यात एका रस्ते अपघातात तिचा मुलगा मरण पावल्याचे महिलेने सांगितले. पण, एलआयसीच्या अधिकाऱ्यांना याबाबत संशय आला आणि त्यांनी घटनेचे चौकशी केली.

दरम्यान, अधिकाऱ्यांना महिलेचा मुलगा जिवंत असल्याचे आढळून आले आणि मृत्यू प्रमाणपत्र बनावट असल्याचे समोर आले. पोलिस उपायुक्त (विभाग पाच) मनोज पाटील यांनी याबाबत माहिती दिली आहे.

 LIC
Maharashtra Budget 2023: महाराष्ट्राचे आज 'महाबजेट', शिंदे-फडणवीस सरकारचा पहिला अर्थसंकल्प

एलआयसीने याप्रकरणी फेब्रुवारीमध्ये पोलिसांत तक्रार दाखल केली होती. महिला आणि तिच्या कथित मुलाने (आता अटक आहे) यांनी 2015 मध्ये उत्पन्न वाढवले ​​होते आणि 8 कोटी रुपयांचे पॉलिसी कव्हर मागितले होते, परंतु एलआयसीच्या दादर शाखेने त्यांना 2 कोटी रुपयांची ऑफर दिली. असे तपासात दिसून आले.

"आम्ही भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली फसवणूक, बनावट कागदपत्रे आणि इतर संबंधित गुन्ह्यांसाठी तिघांना अटक केली आहे. आम्ही महिलेची माहिती मिळविण्याचा प्रयत्न करत आहोत आणि या प्रकरणात आणखी अटक होण्याची शक्यता आहे." असे डीसीपी पाटील म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com