आधी माफी, मगच अयोध्येत प्रवेश : ब्रिजभूषण यांची राज ठाकरेंच्या विरोधाची धार कायम!

'महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे कालनेमीचा राक्षस' भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह
Brij Bhushan Sharan Singh oppose Raj thackeray to come ayodhya
Brij Bhushan Sharan Singh oppose Raj thackeray to come ayodhya Dainik Gomantak
Published on
Updated on

महाराष्ट्राची राजधानी मुंबईत हनुमान चालीसा पठण आणि लाऊडस्पीकरच्या वादाच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी 5 जूनला अयोध्येला (Ayodhya) जाणार असल्याची घोषणा केली होती. त्याच्या या घोषणेनंतर भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) यांनी निदर्शनाची हाक दिली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांना कैसरगंजचे भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी कालनेमीचा राक्षस असे संबोधले आहे. परसपूर येथील एका कार्यक्रमात ते पत्रकारांशी बोलत होते. राज ठाकरेंना अयोध्येच्या सीमेत प्रवेश दिला जाणार नाही, असेही ते म्हणाले. आज मंगळवारी नवाबगंजच्या विष्णोहरपूर येथील खासदारांच्या निवासस्थानापासून शोभायात्रा काढण्यात आली असून ही यात्रा नवाबगंजपर्यंत जाणार आहे.

Brij Bhushan Sharan Singh oppose Raj thackeray to come ayodhya
राणा दाम्पत्याचा जामीन रद्द करण्याची मागणी, मुंबई पोलिसांची विशेष न्यायालयात धाव

सोमवारी खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी महाराष्ट्रातील उत्तर भारतीयांचा राज ठाकरे यांनी अपमान केला असा आरोप केला आहे. राज ठाकरे यांना 5 जून रोजी लखनौ विमानतळाच्या पलीकडे जाऊ देणार नाही, असे ते म्हणाले. राज ठाकरे यांना अयोध्येत यायचे असेल तर आधी त्यांना उत्तर भारतीय समाजाची माफी मागावी लागेल. त्यानंतरच त्यांना राम दर्शनाची परवानगी दिली जाईल. मनसे प्रमुखांच्या अयोध्या दौऱ्यापूर्वी गोंडा आणि अयोध्येसह अनेक ठिकाणी राज ठाकरे गो बॅकचे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. पुढील रणनीतीसाठी बैठक घेत असताना खासदारांनी जनतेसह राज ठाकरेंना अयोध्या सीमेबाहेर रोखण्याचा संकल्प केला आहे.

Brij Bhushan Sharan Singh oppose Raj thackeray to come ayodhya
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणजे नामधारीच : सदाभाऊ खोत

काही दिवसांपूर्वी मोदी-योगी यांच्या विरोधात भाषणबाजी करणारे, कालनेमी राक्षसाच्या वेशात रामच्या दर्शनासाठी येत आहेत. त्यांना रोखण्यासाठी संपूर्ण उत्तर भारतीय समाज सज्ज झाला आहे, असे खासदार ब्रिजभूषण म्हणाले. त्यानंतर एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आंबेडकरनगरात पोहोचलेल्या भाजप खासदाराने उत्तर भारतीयांचा अपमान अजिबात सहन केला जाणार नाही, असे सांगितले. त्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक जोडले जाणार असल्याचे जाहीर आवाहन त्यांनी केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com