दिवाळीत विद्युत रोषणाई करताय सावधान! लाईटिंग करताना साताऱ्यात एकाचा मृत्यू

मात्र एक सातारामधून (Satara) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.
More Family
More FamilyDainik Gomantak
Published on
Updated on

देशभरात दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दिवाळीकरिता आपण सगळेचजण साफसफाई करुन घरासह आजूबाजूचा परिसर विद्युत रोषणाईने उजळून टाकत असतो. मात्र विद्युत रोषणाई करताना आपण काळजी घेतली पाहिजे हे तेवढेच खरं आहे. मात्र एक सातारामधून (Satara) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. साताऱ्यातील एका कुटुंबाला विजेचा धक्का लागला यामध्ये कुटुंबप्रमुख सुनील मोरे (Sunil More) यांचा जागीच मृत्यू झाला तर दुसरीकडे त्यांची पत्नी आणि दोन मुले गंभीर जखमी झाले आहेत. या धक्कादायक प्रकारानंतर संपूर्ण परिसर हादरुन गेला आहे.

दरम्यान, साताऱ्यामधील मोरे कॉलनी परिसरामध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. दिवाळी तोडांवर आली असताना मोरे कॉलनीमध्ये राहणारे सुनील पवार दरवर्षीप्रमाणे घराला विद्युत रोषणाई करत होते. घरामध्ये यावेळी इतर सदस्यही उपस्थित होते. घराच्या दुसऱ्या मजल्यावर विद्युत रोषणाई करत असताना मोरे यांचा हात अनावधानाने वीज वितरणाच्या मुख्य लाईनला लागला. यामुळे पवार यांना जोरदार विजेचा धक्का बसला आणि ते विजेच्या तारेला चिकटले. आपल्या नवऱ्याला विजेचा धक्का लागल्याचे पाहून पत्नीने त्यांच्या बचावासाठी प्रयत्न केला असता त्यांनाही विजेचा धक्का बसला आणि त्यादेखील आपल्या नवऱ्यबरोबर चिकटल्या.

More Family
सावंतवाडी येथे दोन वृद्ध महिलांची हत्या

शिवाय, आपल्या आई वडिलांचा बचाव करण्यासाठी मुलांनी हात लावला आणि त्यांनाही धक्का बसला. दुसरीकडे या घटनेची माहिती मिळताच शेजाऱ्यांनी त्यांचा बचाव करण्यासाठी तात्काळ धाव घेतली. त्यांनी वीज पुरवठा बंद करुन संपूर्ण कुटुंबाला त्वरित उपचाराकरिता रुग्णालयामध्ये दाखल केले. मात्र कुटुंबप्रमुख सुनील पवार यांचे उपचारादरम्यानच मृत्यू झाला. तर पत्नी आणि मुलांवर रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com