H3N2 Virus कोरोना महामारीतून नुकताच देश सावरत असतानाच आता अजून एक संकट घोंगावू लागलंय. ज्याची लक्षणेही ताप, अंगदुखी, खोकला अशीच आहेत. या व्हायरसचा धोका मुंबई आणि पुणे या शहरांमध्ये असल्याचे समजतेय.
या H3N2 व्हायरसचा धोका लक्षात घेऊन या व्हायरस संदर्भात महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत आरोग्य मंत्री आणि अधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्रातील वैद्यकीय यंत्रणांना अलर्ट राहण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिली.
या व्हायरसचा धोका आणि वाढता फैलाव लक्षात घेता सर्वच आरोग्य यंत्रणांना या व्हायरस वर लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना या बैठकीत देण्यात आल्या आहेत. विशेषत: ठाणे, मुंबई आणि पुणे या शहरांमध्ये जास्त लक्ष ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
या व्हासरसचा प्रसार वाढू नये यासाठी काळजी घ्यावी. या संदर्भात खबरदारी घेण्याबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात यावे अशा सूचना या बैठकीत करण्यात आल्या आहेत. अद्यापि कोणतेही निर्बंध लागू करण्यात आलेले नाहीत.
या व्हायरसची लक्षणं आणि धोका
खोकला, नाक वाहणे किंवा बंद होणे
गळ्यात खवखव, ताप
डोकेदुखी, अंगदुखी
थंडी वाजणे, थकवा
हा व्हायरस एका व्यक्तीच्या शरीरातून तो दुस-या व्यक्तीच्या शरीरात पसरतो
फ्लूची बाधा झालेली व्यक्ती शिंकली की त्याचे ड्रॉपलेट हवेत पसरतात
दुसरी व्यक्ती श्वास घेते, तेव्हा व्हायरस त्या व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करतो
जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, गर्दीच्या ठिकाणी हा व्हायरस लवकर पसरतो
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.