Goa Live News: कळंगुटमध्ये हाणामारीत वृद्धाचा मृत्यू; संशयित पोलिसांच्या ताब्यात

Goa Marathi Breaking News: जाणून घ्या गोव्यातील ठळक घडामोडी, राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि नवीन वर्षाच्या बातम्या
Goa live news in Marathi
Goa live news in MarathiDainik Gomantak

कळंगुटमध्ये हाणामारीत वृद्धाचा मृत्यू; संशयित पोलिसांच्या ताब्यात

कळंगुटमधील परोबोवाडो परिसरात आज पहाटे झालेल्या एका हल्ल्यात पश्चिम बंगालमधील एका वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृत व्यक्ती एका बंगल्यात केअरटेकर (रक्षक) म्हणून काम करत होती. किरकोळ वादातून ही हाणामारी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. कळंगुट पोलिसांनी या प्रकरणी वेगाने हालचाली करत एका संशयिताला ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी घडलेल्या या हिंसक घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

लोकशाहीत प्रत्येक लोकप्रतिनिधीला समान अधिकार: दामू नाईक

"सरकार आणि पक्ष या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. एखादा लोकप्रतिनिधी आपल्या पक्षाचा नाही म्हणून त्याला बाजूला सारता येत नाही," असे रोखठोक मत भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी व्यक्त केले आहे. लोकशाहीत प्रत्येक निवडून आलेल्या नेत्याला समान अधिकार असल्याचे त्यांनी नमूद केले.

गेल्या विधानसभा निवडणुकीची आठवण करून देताना ते म्हणाले की, "निवडणुकीवेळी आम्ही आणि मगोप (MGP) एकमेकांचे 'दुश्मन' होतो, मात्र निवडणुकीनंतर ते आमचे युतीचे भागीदार बनले आणि त्यांना मंत्रिमंडळातही स्थान देण्यात आले." राजकीय मतभेद बाजूला ठेवून विकासासाठी एकत्र येणे आवश्यक असल्याचे संकेत त्यांनी या विधानातून दिले आहेत.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून गोमंतकीयांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा

"नूतन वर्षाच्या सुरुवातीला आपण भूतकाळातील धडे सोबत घेऊया आणि सकारात्मक भावनेने एका नव्या सुरुवातीकडे वाटचाल करूया," अशा शब्दांत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्यातील जनतेला नवीन वर्ष २०२६ च्या शुभेच्छा दिल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com