Goa Top News: मोपा लिंक रोडचे उद्घाटन, गौरव बक्षीला अटक, टॅक्सी चालकांचा वाद; गोव्यातील ठळक बातम्या

Goa Today's 11 July 2024 News Live Breakings: गोव्यात दिवसभर घडणाऱ्या विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी.
मोपा लिंक रोडचे उद्घाटन! गडकरींचे गोव्यात आगमन
Nitin Gadkari In GoaDainik Gomantak

गोव्याच्या हरित विकासासाठी मास्टर प्लॉन तयार करा, अन्यथा...

गोव्याचा प्रदुषणमुक्त हरीत विकासासाठी गोवा सरकाराने चांगला मास्टर प्लॉन तयार करावा. अन्यथा गोव्याचा ऋषिकेश हरिद्वार होण्यास वेळ लागणार नाही. मोपा लिंक रोड उद्घाटनाच्या भाषणात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे वक्तव्य.

स्थानिक टॅक्सीवाल्यांना टोल माफी अशक्य, पण सवलतीत पास देण्याची विनंती!

मोपा लिंक रोडवरील टोल गेटवर पेडणेतील स्थानिक टॅक्सीवाल्यांना टोल माफी शक्य नाही. पण केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडे स्थानिक टॅक्सीवाल्यांसाठी सवलतीत पास देण्याची विनंती. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे मोपी लिंक रोड उद्घाटनाच्या भाषणात माहिती.

Nitin Gadkari In Goa: मोपा लिंक रोडचे उद्घाटन! गडकरींचे गोव्यात आगमन

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे मोपा विमानतळ आगमन. मंत्री माविन गुदिन्होंनी केले स्वागत. गडकरींच्या हस्ते होणार मोपा लिंक रोडचे उद्घाटन.

कन्हैयाकुमार खून प्रकरण; मायणा कुडतरी पोलिसांकडून ट्रक चालकाला अटक

कन्हैयाकुमार मंडोल खून प्रकरण मायणा कुडतरी पोलिसांकडून ट्रक चालक वासू कांबळी मदार याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी ट्रक देखील जप्त केला असून, चालक वासूला रिमांडसाठी न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.

Goa Police: गौरव बक्षीला अखेर अटक !

मंत्री निळकंठ हळर्णकरांची गाडी अडविल्या प्रकरणी आणि त्यांच्याशी वाद घालण्याच्या आरोपावरून गौरव बक्षीला अखेर कोलवाळ पोलिसांकडून अटक.

Education: गोव्यात ITI मध्ये आता रशियन, फ्रेंच, जर्मन भाषेचे धडे

गोव्यात आता टुरिस्ट अँबेसिडर कोर्स सुरु केला जाणार आहे. यातून विद्यार्थ्यांना फ्रेंच, रशियन आणि जर्मन भाषेचे धडे दिले जातील. पुढील पाच वर्षात राज्यातील हॉस्पिटलिटी श्रेत्रात दोन लाख रोजगार संधी निर्माण होतील, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले.

Konkan Railway: कोकण रेल्वेच्या दोन ट्रेन्स रद्द, निजामुद्दीन नेहमीच्या मार्गाने धावणार

कोकण रेल्वेकडून आज (11 जुलै) धावणारी मडगाव जंक्शन ते मुंबई सीएसएमटी वंदे भारत (रेल्वे क्र. 22230) आणि मंगळुरु जंक्शन ते मुंबई सीएसएमटी एक्स्प्रेस रद्द. तर, तिरुवनंतपुरम सेंट्रल - एच. निजामुद्दीन (रेल्वे क्र. 22633) मार्ग बदलेली एक्स्प्रेस नेहमीच्या मार्गाने धावेल.

Saligao: साळगावातील रस्त्यांच्या दुरावस्थेविरोधात आपचे आंदोलन

साळगाव येथील रस्त्यांच्या दुरावस्थेविरोधात गोव्यातील आम आदमी पक्षाचे गुरुवारी (11 जुलै) आंदोलन. काँग्रेसमधून भाजपमध्ये पक्षांतर केलेले आमदार केदार नाईक दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात अपयशी ठरल्याचा आपचा आरोप.

Taxi Drivers: स्थानिक टॅक्सी चालकांविरूद्ध तक्रार

गोवा माईल्सचे टॅक्सी चालक स्थानिक टॅक्सी चालकांविरूद्ध तक्रार करण्यासाठी कोलवा पोलिसांत दाखल.

ख्रिश्चन समाजातील सुतारांचा राज्य ओबीसी यादीत समावेशासाठी व्हिएगस यांचा खासगी ठराव

ख्रिश्चन समाजातील सुतारांचा राज्य ओबीसी यादीत समावेश आणि कृषी व दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना कॅशलेस सबसिडी वाटप हे दोन खासगी ठराव आमदार व्हेंझी व्हिएगस येणाऱ्या विधानसभा अधिवेशनात मांडणार. ख्रिश्चन सुतारांचे संविधानिक फायदे जपण्यासाठी आणि शेतकऱ्यांचा ताण कमी करण्यासाठी मांडणार ठराव.

Goa Congress: डिचोलीत काँग्रेसचा 'तिरडी स्टंट'

डिचोलीतील बगलमार्ग रोखला. काँग्रेस कार्यकर्त्यांनी तिरडीसह आडवे होऊन बगलमार्ग अडवला. सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना करेपर्यंत बगलमार्ग बंद ठेवा. कार्यकर्त्यांची मागणी.

Pernem Taxi Owners: आमदार आर्लेकरांच्या घराबाहेर एकामेकांना पेडणेकरच भिडले

पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकरांच्या घराबाहेर पेडणेकरांमध्येच राडा. पेडण्याचेच काही गोवा माईल्सचे टॅक्सी चालक आर्लेकरांसोबत चर्चा करायला गेले असता पेडणेचे स्थानिक टॅक्सी चालक तिथे गेले असता उद्भवला प्रसंग.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com