Goa Today's News Live: मनोज परब यांच्यापेक्षा आमचं गोव्यावर अधिक प्रेम; सिद्धण्णा मेटी

Goa News Live Update In Marathi: गोव्यातील राजकारण, कला - क्रीडा - संस्कृती, पर्यटन, इफ्फी वेळापत्रक, फोंडा पोटनिवडणूक यासह विविध क्षेत्रातील ताज्या बातम्या.
Manoj Parab Press Conference
Manoj Parab Dainik Gomantak

मनोज परब यांच्यापेक्षा आमचं गोव्यावर अधिक प्रेम; सिद्धन्ना मेटी

मनोज परब यांच्यापेक्षा आमचं गोव्यावर अधिक प्रेम आहे. कर्नाटक आमची जन्मभूमी आहे पण गोवा कर्मभूमी. आम्हाला गोवा आणि कर्नाटक यांच्यातील बंध अधिक मजबूत करायचा आहे. घाटी - घाटी म्हणत आरजीला किमान एकतरी जागा जिंकता आली अन्यथा तेही शक्य नव्हते, असा पलटवार सिद्धण्णा मेटी यांनी लगावला आहे.

साखळीत दाट धुक्याची झालर

पावसाचा अंदाज व अधूनमधून बरसात सुरू असतनाच आज सकाळी साखळीत लोकांना दाट धुके अनुभवले. धुके बरेच दाट असल्याने वाहनचालकांना काळजीपूर्वक वाहने हाकावी लागत होती.

इंग्रजांनी फोडा आणि राज्य करा असं धोरण वापरलं त्याप्रमाणे आरजी स्थलांतरीतांचा द्वेष करुन गोमंतकीयांमध्ये फूट पाडतंय; मेटी

सिद्धन्ना मेटी यांनी पुन्हा मनोज परब यांच्यावर हल्लाबोल करत त्यांना जोरदार प्रतित्युत्तर दिले आहे. गरीब लोकांच्या बाबतीत अजिबात राजकारण झालं नाही पाहिजे. मतांसाठी परब स्थलांतरितांना टार्गेट करतंय असा आरोपही मेटींनी केला. इंग्रजांनी फोडा आणि राज्य करा असं धोरण वापरलं त्याप्रमाणे आरजी स्थलांतरीतांचा द्वेष करुन गोमंतकीयांमध्ये फूट पाडतंय, असे मेटी म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com