
मोले चेकपोस्टपासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर मोठ्या प्रमाणावर गोमांस सापडल्याची घटना समोर आली आहे. स्थानिक ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, एका व्यक्तीच्या बागायतीत अंदाजे तीन टन गोमांस ठेवण्यात आले होते. ग्रामस्थांनी तात्काळ याची माहिती पोलिसांना दिली. घटनास्थळी कुळे पोलीस दाखल झाले असून त्यांनी गोमांस आणि त्या ठिकाणी असलेली एक रिक्षा ताब्यात घेतली आहे.
मायणा-कुडतरी पोलिसांनी नेसैया गेटजवळील साओ होजे दे एरियल परिसरातील एका बंद घरावर टाकलेल्या छाप्यात मोठ्या प्रमाणावर ऑनलाइन जुगार अड्डा उध्वस्त केला आहे. या कारवाईत पोलिसांनी २० जणांना अटक केली असून, त्यांच्याकडून ४.४ लाख रुपये रोख, चार टॅब्लेट, एक राउटर आणि एक मोडेम जप्त करण्यात आले आहेत.
गोव्यातील नागरिकांसाठी मोठा दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जाहीर केले की, घरदुरुस्ती आणि विभाजन प्रक्रिया आता अधिक सूटसुटीत आणि सोपी केली जाणार आहे. प्रशासनातील गुंतागुंत कमी करून नागरिकांना सुलभ सेवा देण्यावर सरकारचा भर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 'माझे घर' या योजनेअंतर्गत अर्ज वितरण कार्यक्रमाला मये येथे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला
म्हादई नदीवरील कळसा-भांडुरा प्रकल्पाला मंजुरी देण्यास कोणताही कायदेशीर अडथळा नसल्याचे कर्नाटक सरकारने पुन्हा एकदा केंद्र सरकारसमोर नमूद केले. पर्यावरण मंत्रालयाने कळसा–भांडुरा प्रकल्पाबाबत कर्नाटकला तपशीलाबाबत पत्र पाठवले होते. त्या पत्राला कर्नाटकने काहीच दिवसांपूर्वी दिलेल्या उत्तरात कळसा–भांडुराला मंजुरी देण्यास कोणताही कायदेशीर अडथळा नसल्याचे म्हटले आहे. गोव्याच्या मुख्य वन्यजीव वॉर्डननी २९ मार्च २०२३ रोजी काम रोखण्याचा जो आदेश दिला होता.
सरकारी जमीन विकत घेताना किंवा घर बांधताना विचार करा, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा सल्ला, 'माझे घर' योजनेंतर्गत डिचोलीत अर्ज वितरीत करण्याच्या कार्यक्रमा दरम्यान ते बोलत होते.
मोले पंचायत उपसरपंचपदी प्रणाली द.वेरेकर यांची बिनविरोध निवड झाली आहे.निर्वाचन अधिकारी म्हणून देऊ माईणकर उपस्थित होते.
वास्को: वास्कोचे आमदार कृष्णा साळकर यांच्या हस्ते सासमोळे-बायणा येथे दीर्घकाल प्रलंबित असलेल्या नाल्याच्या कामाचा शुभारंभ झाला. सुमारे ४० लाख रुपये खर्चाच्या या प्रकल्पामुळे पावसाळ्यातील पाणी साचणे व पूर परिस्थिती टाळता येणार आहे. हा प्रकल्प जलसंपदा विभागाअंतर्गत राबवला जात असून, परिसरातील ड्रेनेज व स्वच्छता व्यवस्था सुधारण्याची अपेक्षा आहे. साळकर यांनी सांगितले की, पावसाचे पाणी सुरळीत वाहून जाण्यास मदत होईल आणि आरोग्यावर होणारा परिणामही टळेल.
रेल्वेच्या धडकेने एक जण ठार झाला. थिवी रेल्वेस्टेशन जवळ शनिवारी ही घटना घडली. ही व्यक्ती अंदाजे ३५ ते ४० वयोगटातील आहे. अनैसर्गिक मृत्यू म्हणून कोकण रेल्वे पोलिसांनी ही घटना नोंदवून घेतली आहे. मृतदेह गोमेकॉच्या शवागारात ठेवला आहे. उपनिरीक्षक पी. जोशी पुढील तपास करीत आहेत.
कोलवा पोलिसांनी शनिवारी रात्री संशयास्पद फिरणाऱ्या १० जणांना ताब्यात घेतले. प्रतिबंधात्मक कायद्याखाली ही करवाई करण्यात आल्याची माहिती कोलवा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विक्रम नाईक यांनी दिली. यापुढेही ही कारवाई चालूच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, कोलवा पोलिसांनी विना वाहतूक परवाना दुचाकी चालविणाऱ्या पाच दुचाकी जप्त केल्या तर दारूच्या नशेत दुचाकी चालविणाऱ्या एकावर करवाई केली.
कला अकादमीला मूळ स्थितीत परत आणण्याची मागणी कला राखण मांड यांनी कला आणि संस्कृती मंत्री रमेश तवडकरांना केली.सर्व समस्या सोडवण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी बैठक आयोजित करण्याचे आश्वासन मंत्र्यांनी दिले.कला राखण मांडच्या सदस्यांनी मंत्र्यांवर विश्वास दाखवण्यात आला आहे.
आप गोवा प्रमुख अमित पालेकर यांनी या प्रकरणामागे राजकारण असल्याचा आरोप केला आहे आणि असा दावा केला आहे की कलम १२०(ब) चा समावेश हा त्यांना खोट्या पद्धतीने गोवण्याचा प्रयत्न आहे.
पक्षातील अलिकडच्या राजीनाम्यांच्या रांगेवर आप गोवा अध्यक्ष अमित पालेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे, ज्यात असे म्हटले आहे की "हे स्पष्ट आहे की या राजीनाम्याच्या कथेमागे कोणीतरी आहे. राजीनाम्यांचा पक्षावर परिणाम होत असला तरी, ते त्याचे मूळ स्वरूप किंवा कामगिरी बदलत नाहीत," असे पालेकर म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.