Goa Live Updates: 24 तासांत 10 इंचापेक्षा अधिक पाऊस!

Goa Marathi Latest News Today: जाणून घ्या गोव्यातील राजकारण, क्रीडा, मनोरंजन, हवामान आणि इतर महत्वाच्या घडामोडी
Marathi Breaking News
Marathi Breaking News Dainik Gomantak

Goa Rain: 24 तासांत 10 इंचापेक्षा अधिक पाऊस!

यंदाच्या मान्सून हंगामात 1 जून ते 28 ऑगस्टच्या सकाळी 8.30 पर्यंत राज्यात 109.22 इंच पावसाची नोंद. बुधवार आणि गुरुवारच्या 24 तासांत 10 इंचापेक्षा अधिक पाऊस. आतापर्यंत धारबांदोड्यात सर्वाधिक 143.53 इंच पाऊस.

Goa Rain: भर चतुर्थीत पावसाचा तडाखा

भर चतुर्थीत पावसाचा तडाखा. नार्वे येथे घरावर कोसळली संरक्षक भिंत. अनर्थ टळला. मर्मवाडा येथील ज्येष्ठ महिला सुखरूप.

Bicholim: डिचोलीत पुरसदृश्य स्थिती

डिचोलीत पुरसदृश्य स्थिती. मुसळधार पावसामुळे बंदरवाडा रस्ता पाण्याखाली. रिव्हर फ्रंट प्रकल्पातही घुसले पाणी. विविध ठिकाणी पडझड.

Rivona Death: रिवणमधील दोन भावांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

रिवण येथील दोन भाऊ, राजेंद्र गावकर (४६) आणि मोहनदास गावकर (४०) यांचा काल रात्री विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. आपल्या गुरांसाठी गवत कापण्यासाठी ते जंगलात गेले असता ही घटना घडली.

गावणे- बांदोडा रस्त्यावर कोसळले आंब्याचे झाड, वाहनांचे नुकसान

गावणे- बांदोडा येथे रस्त्यावर कोसळले मोठे आंब्याचे झाड. पार्क केलेल्या काही वाहनाचे नुकसान. फोंडा अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल.

Goa Rain: दूधसागर नदीची पातळी वाढली, रस्ते पाण्याखाली

मुसळधार कोसळलेल्या पावसामुळे दूधसागर नदीच्या पाण्याची पातळी वाढली. दावकोण व निरंकाल येथील रस्ते पाण्याखाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com