Goa Live Updates: अनमोड घाट रस्ता दुरुस्ती संथगतीने सुरू

Goa Marathi Latest News Today 3 September 2025: जाणून घ्या गोव्यातील राजकारण, क्रीडा, मनोरंजन, हवामान आणि इतर महत्वाच्या घडामोडी
Marathi breaking news Goa
Marathi breaking news Goa Dainik Gomantak

Anmod Ghat: अनमोड घाट रस्ता दुरुस्ती संथगतीने सुरू

अनमोड राष्ट्रीय महामार्ग कोसळून आज दोन महिने पूर्ण झाले. परंतु दुरुस्तीचे काम अद्याप संथगतीने सुरू असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्हाधिकाऱ्यांकडे अवजड वाहनांवरील बंदी आणखी दोन महिने वाढवावी, अशी विनंती केली आहे. त्यामुळे लवकरच जिल्हाधिकाऱ्यांकडून नवीन अधिसूचना निघण्याची शक्यता आहे.

Digambar Kamat: मंत्री दिगंबर कामत घेणार खात्यांचा ताबा

सार्वजनिक बांधकाममंत्री तथा मडगावचे आमदार दिगंबर कामत हे आपल्या खात्यांचा ताबा उद्या बुधवारी ३ सप्टेंबर रोजी घेणार आहेत.

Goa Beach: 20 किनाऱ्यांवर होणार स्वच्छता जागरूकता

आंतरराष्ट्रीय किनारी स्वच्छता दिनानिमित्त भारतीय तटरक्षक दलातर्फे २० सप्टेंबर रोजी बायणा, बोगमाळो, कोलवा, बाणावली, वेल्साव, माजोर्डा, बेतालबाती, वार्का, मोबोर, बेतूल, उतोर्डा, बागा, मिरामार, सिरिदोना, अरंबोल, मोरजी, वागातोर, अंजुना, कळंगुट, कांदोळी आदी २० किनाऱ्यांवर जागरूकता मोहीम राबविण्यात येणार आहे. यात केंद्र, राज्य सरकारचे विविध विभाग, खासगी कंपन्या, विविध संस्था आदी सहभागी होणार आहेत.

Bicholim Jama Masjid: मशिदीच्या कुंपणासंबंधी बेकायदा काहीच नाही, अध्यक्षासह मुस्लिम बांधवांचा दावा

मशिदीच्या कुंपणासंबंधी बेकायदा काहीच नाही अन् वादही नाही. डिचोलीच्या आझाद जामा मशीद समितीच्या सचिवांनी केलेले आरोप दिशाभूल करणारे. त्यांच्याकडूनच कायदा आणि सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न. मशीद समिती अध्यक्षासह मुस्लिम बांधवांचा दावा.

CM Pramod Sawant Delhi Visit: मुख्यमंत्री प्रमोद सावंत दिल्लीच्या दौऱ्यावर

मुख्यमंत्री प्रमोद सावंत पुन्हा दिल्लीच्या दौऱ्यावर गेले आहेत. तिथे त्यांनी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची भेट घेतली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com