Goa Live News: होंडा येथे चालत्या दुचाकीवर झाडाची फांदी कोसळली; चालक गंभीर जखमी

Goa Marathi Breaking News: जाणून घ्या गोव्यातील ठळक बातम्या आणि घडामोडी. राजकारण, क्रीडा, मनोरंजन आणि महत्वाची माहिती.
Goa live news
Goa live newsDainik Gomantak

होंडा येथे चालत्या दुचाकीवर झाडाची फांदी कोसळली; चालक गंभीर जखमी

होंडा येथे रस्त्त्यावरून चाललेल्या एका दुचाकीस्वारावर अचानक झाडाची मोठी फांदी कोसळून अपघात झाला. या अपघातात दुचाकीचा चालक गंभीर जखमी झाला असून, दुचाकीचेही नुकसान झाले आहे. जखमी चालकाला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

गोव्यात 'टीव्हीएस मोटोसूल '5.0' चा थरार; 8,000 रायडर्सची उपस्थिती, दोन नव्या बाइक्सचे अनावरण

टीव्हीएस मोटर कंपनीने (TVS Motor Company) गोव्यात आयोजित केलेल्या 'मोटोसूल ५.०' (MotoSoul 5.0) या रायडर महोत्सवात ८,००० हून अधिक रायडर्सनी हजेरी लावली. या कार्यक्रमात कंपनीने आपली नवी बाईक 'टीव्हीएस रोनिन आगोंदा' (किंमत १,३०,९९०) आणि २० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल 'अपाचे आरटीएक्स अ‍ॅनिवर्सरी एडिशन' बाईकचे अनावरण केले.

यासोबतच, रोनिन केंसाई आणि अपाचे आरआर ३१० स्पीडलाईन (Apache RR310 Speedline) या दोन कस्टम-मेड बाईक्स, तसेच 'आर्ट ऑफ प्रोटेक्शन' ही मर्यादित आवृत्तीची हेल्मेट मालिका प्रदर्शित करण्यात आली. पहिल्या दिवशी एफएमएक्स स्टंट्स, रायडरस्फेअर, डर्ट आणि फ्लॅट ट्रॅक स्पर्धा, आणि बादशाह तसेच डीजे अकबर सामी यांच्या सादरीकरणाने रायडर संस्कृतीचा उत्सव साजरा करण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com