Goa News: अमित पालेकर यांची 60 दिवसांत ठरणार नव्या राजकीय प्रवासाची दिशा; वाचा दिवसभरातील घडामोडी

Goa Marathi Breaking News: जाणून घ्या गोव्यातील राजकरण, क्रीडा, मनोरंजन आणि इतर महत्वाच्या घडामोडी मराठीमध्ये
pravin arlekar babu ajgaonkar
AAP Leader Amit PalekarDainik Gomantak
Published on
Updated on

विरेश बोरकर यांनी मुख्यमंत्र्यांना दिले निवेदन

सेंट आंद्रे मतदारसंघाचे आमदार विरेश बोरकर यांनी आज मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेऊन एक महत्त्वाचे निवेदन सादर केले. मतदारसंघातील जमिनींच्या वापरात करण्यात आलेले बदल तातडीने रद्द करण्याची मागणी त्यांनी या निवेदनातून केली आहे.

काळ्या बिबट्याचा मृत्यू; ट्रान्सफॉर्मरचा शॉक लागल्याचा संशय

भगवान महावीर वन्यजीव अभयारण्यांतर्गत येणाऱ्या सोनावली भागात एका दुर्मिळ काळ्या बिबट्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. सोनावली मंदिराजवळ असलेल्या एका ट्रान्सफॉर्मरपाशी हा बिबट्या मृतावस्थेत आढळून आला.

"पर्यावरण विनाश आणि भ्रष्टाचारावर सरकारला धारेवर धरणार"

आगामी विधानसभा अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षातील आमदारांची एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत भाजप सरकारला विविध मुद्द्यांवर घेरण्यासाठी संयुक्त रणनीती आखण्यात आली आहे.

अमित पालेकर यांचा 'आप'ला रामराम; पुढील 60 दिवसांत नव्या राजकीय प्रवासाची दिशा ठरणार

गोव्यातील आम आदमी पक्षाला (AAP) मोठा धक्का बसला असून, माजी प्रदेशाध्यक्ष ॲड. अमित पालेकर यांनी काल (५ जानेवारी) पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्यासोबत प्रभारी प्रदेशाध्यक्ष श्रीकृष्ण परब यांनीही पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे.

'हडफडे आग प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करा'; विजय सरदेसाई विधानसभेत आवाज उठवणार

हडफडे येथील 'बिर्च बाय रोमिओ लेन' नाईटक्लबमध्ये झालेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेवरून गोव्याचे राजकारण तापले आहे. गोवा फॉरवर्ड पक्षाचे आमदार विजय सरदेसाई यांनी या प्रकरणाच्या आतापर्यंतच्या चौकशीवर तीव्र संताप व्यक्त केला असून, आगामी विधानसभा अधिवेशनात न्यायालयीन चौकशीची मागणी करणार असल्याचे जाहीर केले आहे.

"रवी नाईकांच्या मुलालाच उमेदवारी द्या"; फोंडा पोटनिवडणुकीवर सुदिन ढवळीकर आपल्या भूमिकेवर ठाम

फोंडा विधानसभा मतदारसंघाच्या आगामी पोटनिवडणुकीवरून गोव्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. मगोपचे नेते आणि मंत्री सुदिन ढवळीकर यांनी आज पुन्हा एकदा स्पष्ट केले की, ते आपल्या आधीच्या विधानावर ठाम आहेत. दिवंगत माजी मंत्री रवी नाईक यांच्या मुलालाच भाजपने या पोटनिवडणुकीचे तिकीट द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

गोव्यात जूनपासून पशुवैद्यकीय महाविद्यालय सुरू होणार

गोव्यातील शैक्षणिक आणि कृषी क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या पशुवैद्यकीय महाविद्यालय आणि मत्स्यव्यवसाय महाविद्यालय संदर्भात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज पणजी येथे एक उच्चस्तरीय आढावा बैठक घेतली.

म्हापसा-खोर्ली येथे घराला आग; लाखांहून अधिक रुपयांचे नुकसान

म्हापसा येथील खोर्ली परिसरात एका घराला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत घराचे अंदाजे १ लाख रुपयांहून अधिक नुकसान झाले असल्याचे प्राथमिक अहवालात म्हटले आहे.

"युनिटी मॉलकडे सर्व परवाने आहेत; ८ जानेवारीनंतरच सविस्तर बोलेन" – मंत्री रोहन खवंटे

चिंबल येथील 'युनिटी मॉल' प्रकल्पावरून सुरू असलेल्या वादावर पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी आज आपली भूमिका स्पष्ट केली. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट असल्याने, न्यायालयाच्या सुनावणीनंतरच म्हणजेच ८ जानेवारी २०२६ नंतर यावर सविस्तर भाष्य करणे योग्य ठरेल, असे त्यांनी सांगितले.

वास्कोची स्नेहा यादव बीएसएफमध्ये भरती; भारत-बांगलादेश सीमेवर देशसेवा

गोव्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवत वास्को येथील २४ वर्षीय स्नेहा यादव (Sneha Yadav) हिची सीमा सुरक्षा दलात (BSF) निवड झाली आहे. विशेष म्हणजे, या भरतीत संपूर्ण गोवा राज्यातून निवड झालेली ती एकमेव उमेदवार ठरली आहे.

कलंगुटमध्ये निर्माणाधीन हॉटेलला भीषण आग

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com