Goa News: मच्छीमार पेले यांनी जलक्रीडा आणि पर्यटनातील महत्त्वाच्या उपक्रमांसाठी पर्यटन मंत्री रोहन खवंटे यांचे आभार मानले

Goa Marathi Breaking News: जाणून घ्या गोव्यातील ताज्या आणि ठळक घडामोडी. राजकारण, क्रीडा, मनोरंजन आणि इतर घडामोडी.
goa breaking news marathi
goa breaking news marathiDainik Gomantak

Goa Rain: जोरदार पाऊस शक्य; आज ‘ऑरेंज अलर्ट’

राज्यात आठवड्याभरापासून पावसाचा जोर मंदावला होता; परंतु शुक्रवारी दुपारनंतर राज्यात पावसाने पुन्हा जोर धरला आहे. बंगालच्या उपसागरातून पश्चिमेकडे सरकणारा कमी दाबाचा पट्टा मध्य भारतातून पुढे जात असल्याने गोव्यासह मध्य भारत, महाराष्ट्र आणि इतर काही भागांत पुढील दोन-तीन दिवस मध्यम ते मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता आहे.

कोलव्यात क्लिनिकला आग

कोलव्यात एका दंतक्लिनिकला आज सकाळी अचानक आग लागली. सध्या आग लागण्याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. अग्निशमन दल त्वरित घटनास्थळी पोहोचले आणि आग विझवली.

माजोर्डा धीरयोप्रकरणी दोघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी

माजोर्डा येथील धीरयो प्रकरणी अटकेत असलेल्या तीनपैकी दोघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे, तर एकाची प्रकृती बिघडल्याने त्याला इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणातील अन्य एक संशयित रुई मिनेझिस हा अद्याप फरार असून अजूनही तो पोलिसांना सापडू शकलेला नाही.

रेल्वे मार्ग दुपदरीकरणासाठी महामंडळ सज्ज

कोकण रेल्वे महामंडळाने ठोकूर ते बायंडूर तसेच माजोर्डा ते वैभववाडी या रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण करण्याच्या कामासाठी व्यवहार्यता अहवाल तयार करण्यासाठी निविदा मागविल्या आहेत. हे अंतर २६३ कि.मी. अंतर आहे. रोहा ते वीर या ४७ कि.मी. मार्गाचे दुपदरीकरण यापूर्वीच पूर्ण करण्यात आले आहे. कोकण रेल्वे महामंडळ ७४१ कि.मी. पैकी ३१० कि.मी. मार्गाचे दुपदरीकरण पूर्ण करण्यासाठी कोकण रेल्वे महामंडळ सज्ज झाले आहे.

जागतिक मराठी संमेलनाध्यक्षपदी डॉ. काकोडकर

२१ व्या जागतिक मराठी संमेलनाचे आयोजन ९ ते ११ जानेवारी २०२६ दरम्यान पणजीतील कला अकादमी येथे आयोजित करण्यात येणार असून या संमेलनाचे अध्यक्षपद ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर तसेच स्वागताध्यक्षपद मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्वीकारले आहे. जगभरातील साहित्य, औद्योगिक तसेच इतर विविध क्षेत्रातील मान्यवर या संमेलनास उपस्थिती लावणार आहेत, असे जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष रामदास फुटाणे यांनी सांगितले.

गोव्यात 6 महिन्यांत 5.45 लाख पर्यटक

राज्यात यावर्षी पहिल्याच सहा महिन्यांत तब्बल ५.४५ लाखांहून अधिक पर्यटकांचे आगमन झाले असून यामध्ये ५.१८ लाख देशांतर्गत आणि २७ हजार परदेशी प्रवाशांचा समावेश होता. ही आकडेवारी मागील वर्षाच्या तुलनेत ८.४ टक्क्यांनी अधिक असल्याचे पर्यटन खात्याने जाहीर केले असून वाढत्या पर्यटक संख्येबरोबरच नव्या आंतरराष्ट्रीय थेट उड्डाणे, चार्टर फ्लाईट्स आणि क्रूझ आगमनामुळे गोवा आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावर अधिक बळकटपणे उभा राहत आहे.

ओंकार हत्ती सातोशे मुडुरे महाराष्ट्र भागात

ओंकार हत्ती सातोशे मुडुरे महाराष्ट्र भागात तेरेखोल नदी क्रॉस करून गेलेला आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेतकरी त्या हत्तीला परत गोव्यात पिटाळून लावण्याचा प्रयत्न करतात.

वृद्ध विक्रेत्या महिलांची लुबाडणूक रोखण्यासाठी डिचोली पोलिसांकडून जागृती मोहीम

मये व साखळीत वृद्ध विक्रेत्या महिलांची लुबाडणूक रोखण्यासाठी डिचोली पोलिसांकडून बाजारातील विक्रेत्यांमध्ये जागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे. अंगावरील दागिने किंवा किंमती वस्तू कोणालाही न देण्याचे आवाहन. स्वतः सतर्क राहून इतरांनाही सतर्क करावे - डिचोली पोलीस

वीज खात्यातील नवीन प्रकल्पासाठी जैका मार्फत प्रक्रिया सुरु

वीज खात्यातील नवीन प्रकल्पासाठी जैका मार्फत प्रक्रिया सुरु. अंदाजे ५ हजार कोटी रुपयाचा खर्च अपेक्षित- वीज मंत्री सुदिन ढवळीकर

मच्छीमार पेले यांनी जलक्रीडा आणि पर्यटनातील महत्त्वाच्या उपक्रमांसाठी पर्यटन मंत्री रोहन खवंटे यांचे आभार मानले

मच्छीमार पेले यांनी जलक्रीडा आणि पर्यटनातील महत्त्वाच्या उपक्रमांसाठी पर्यटन मंत्री रोहन खवंटे यांचे आभार मानले. त्यांनी सांगितले गोवा जगातील नंबर 1 पर्यटन स्थळ बनू शकेल

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com