Goa Live News: आगोंद किनाऱ्यावर नाताळच्या रात्री 'ऑलिव्ह रिडले'चे आगमन; ४४१ अंड्यांची नोंद

Goa Breaking News Marathi: जाणून घ्या गोव्यातील राजकरण, क्रीडा,मनोरंजन आणि इतर घडामोडी
Goa live news in Marathi
Goa live news in MarathiDainik Gomantak

आगोंद किनाऱ्यावर नाताळच्या रात्री 'ऑलिव्ह रिडले'चे आगमन; ४४१ अंड्यांची नोंद

काणकोण तालुक्यातील आगोंद हा समुद्रकिनारा कासवांच्या प्रजननासाठी (Turtle Nesting) जगभरात प्रसिद्ध आहे. नाताळच्या उत्सवाच्या रात्री, म्हणजेच २५ डिसेंबर रोजी, एका मादी 'ऑलिव्ह रिडले' कासवाने या किनाऱ्यावर सुरक्षित जागा शोधून तब्बल ४४१ अंडी घातली. या हंगामातील आगोंद किनाऱ्यावरील कासवाच्या आगमनाची ही दुसरी वेळ आहे.

कळंगुट पोलीस स्थानक ठरले गोव्यातील सर्वोत्तम

रविवारी झालेल्या एका विशेष समारंभात कळंगुट पोलीस स्थानकाला 'सर्वोत्तम पोलीस स्थानक २०२५' (Best Police Station in Goa) हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पोलीस दलातील कार्यक्षमता, गुन्हेगारीवर नियंत्रण आणि जनतेला दिलेल्या तत्पर सेवेची दखल घेऊन हा अधिकृत ट्रॉफी आणि सन्मान देण्यात आला आहे.

चोरला घाटात पहाटे टेम्पोला भीषण आग; 5लाखांचे नुकसान, वाळपई अग्निशमन दलाची धाव

आज, ३० डिसेंबर २०२५ रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास चोरला घाटातील 'वडले तुम' भागात एका टेम्पोला अचानक आग लागली. ही आग इतकी भीषण होती की काही वेळातच संपूर्ण टेम्पो आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे समजते, मात्र वाहनाचे सुमारे ५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com