Goa Assembly Session: 'कुशावती' जिल्हा म्हणजे 'विकसित गोवा 2037' कडे टाकलेले मोठे पाऊल

Goa Assembly Winter Session: जाणून घ्या गोव्याच्या हिवाळी अधिवेशनातील महत्वाचं मुद्दे; राज्यातील इतर महत्वाच्या घडामोडी मराठीमध्ये.
Goa Winter Session News
Goa Winter Session NewsDainik Gomantak

'कुशावती' जिल्हा म्हणजे 'विकसित गोवा 2037' कडे टाकलेले मोठे पाऊल

गोवा विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांनी आपल्या अभिभाषणात प्रस्तावित 'कुशावती' जिल्ह्याचे महत्त्व अधोरेखित केले. हा नवीन जिल्हा केवळ प्रशासकीय बदल नसून राज्याच्या विकेंद्रीकरणाच्या दिशेने घेतलेले एक ऐतिहासिक पाऊल असल्याचे त्यांनी सांगितले.

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांच्यासह सर्व विरोधी आमदार सभागृहाबाहेर

गोवा विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाची सुरुवात आज अत्यंत तणावपूर्ण वातावरणात झाली. हडफडे येथील 'बिरच बाय रोमिओ लेन' (Birch by Romeo Lane) या नाईट क्लबमध्ये लागलेल्या आगीत २५ जणांचा बळी गेल्याच्या घटनेवरून विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला.

जनगणनेमुळे निवडणूक लवकर? विजय सरदेसाई यांचा तर्क

विजय सरदेसाई यांच्या मते, फेब्रुवारी २०२७ मध्ये जनगणनेचा मुख्य टप्पा (Population Enumeration) सुरू होणार आहे. नियमानुसार, जनगणनेच्या मोठ्या प्रक्रियेदरम्यान सरकारी यंत्रणा (शिक्षक, महसूल कर्मचारी) त्यात व्यस्त असते. तसेच, जनगणनेच्या काही काळ आधी आणि दरम्यान निवडणुका घेणे प्रशासकीयदृष्ट्या कठीण असते. त्यामुळे, फेब्रुवारी २०२७ मध्ये नियोजित असलेली गोवा विधानसभा निवडणूक अलीकडे ओढून डिसेंबर २०२६ मध्येच घेतली जाऊ शकते, असा त्यांचा अंदाज आहे.

गोवा विधानसभा हिवाळी अधिवेशन 2026; पहिल्या दिवसाचे ठळक मुद्दे

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी माहिती दिल्याप्रमाणे, आजपासून गोवा विधानसभेच्या ५ दिवसांच्या हिवाळी अधिवेशनाला (Winter Session) सुरुवात होणार आहे. आजचा दिवस प्रामुख्याने घटनात्मक औपचारिकता आणि राज्यपालांच्या अभिभाषणाचा आहे.

गोवा विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात

गोवा विधानसभेच्या ५ दिवसांच्या हिवाळी अधिवेशनाला (Winter Session) आज सकाळी ११:३० वाजता अधिकृतपणे सुरुवात होणार आहे. हे अधिवेशन १६ जानेवारी २०२६ पर्यंत चालणार असून, यामध्ये एकूण पाच बैठका होणार आहेत.

सभापती म्हणून डॉ. गणेश गावकर यांचे पहिले अधिवेशन

गोव्याचे नवनियुक्त सभापती डॉ. गणेश गावकर यांच्या नेतृत्वाखाली गोवा विधानसभेच्या ५ दिवसांच्या हिवाळी अधिवेशनाला (Winter Session) आज सकाळी ११:३० वाजता मोठ्या उत्साहात सुरुवात होणार आहे. सभापती म्हणून निवडून आल्यानंतरचे हे त्यांचे पहिलेच अधिवेशन आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com