WPL 2023 मध्ये आज सुपर संडे! 'या' चार संघात रंगणार दोन सामने, जाणून घ्या सर्वकाही

वूमन्स प्रीमियर लीग 2023 मध्ये आज दोन सामने खेळवण्यात येणार असून कुठे आणि कधी हे होणार आहेत, जाणून घ्या.
WPL 2023
WPL 2023Dainik Gomantak

WPL 2023: वूमन्स प्रीमियर लीगच्या पहिल्या हंगामाला दमदार सुरुवात झाली. शनिवारी (4 मार्च) पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्सने गुजरात जायंट्सला तब्बल 143 धावांनी पराभूत केले. त्यानंतर आता रविवारी (5 मार्च) या लीगमधील पहिला डबल हेडर खेळवला जाणार आहे. डबल हेडर म्हणजे एकाच दिवशी दोन सामने खेळवले जातात.

रविवारी पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात रंगणार आहे. हा सामना ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 3.30 वाजता या सामन्याला सुरुवात होणार आहे. दरम्यान, या सामन्यात बेंगलोरचे नेतृत्व स्मृती मानधना करताना दिसणार आहे, तर दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व मेग लॅनिंग करताना दिसेल.

WPL 2023
WPl 2023 च्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा दणदणीत विजय, गुजरातला...

या सामन्यानंतर भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता युपी वॉरियर्स विरुद्ध गुजरात जायंट्स संघात सामना सुरू होईल. हा सामना नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. हा सामना या स्पर्धेतील गुजरातचा दुसरा सामना असणार आहे.

दरम्यान, मुंबई इंडियन्सविरुद्ध पहिल्या सामन्यात खेळताना पराभवाबरोबरच त्यांची कर्णधार बेथ मूनी दुखापतग्रस्त झाल्याने मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे आता ती रविवारी होणाऱ्या सामन्यात खेळण्याची शक्यता कमी आहे. जर ती या सामन्यात खेळली नाही, तर स्नेह राणा गुजरातचे नेतृत्व करताना दिसू शकते. तसेच युपीचे नेतृत्व एलिसा हेली करताना दिसणार आहे.

हे दोन्ही सामन्यांचे थेट प्रक्षेपण स्पोर्ट्स 18 नेटवर्कच्या चॅनेलवर आणि जिओ सिनेमा ऍपवर पाहाता येणार आहे.

WPL 2023
WPL 2023 च्या पहिल्याच हरमनप्रीत कौरने रचला इतिहास, अशी कामगिरी करणारी...

असे आहेत चारही संघ -

  • दिल्ली कॅपिटल्स -

जेमिमाह रोड्रिग्, शफाली वर्मा, मॅरिझेन केप, मेग लॅनिंग (कर्णधार), ऍलिस कॅप्सी, शिखा पांडे, जेस जोनासन, लौरा हॅरिस, राधा यादव, अरुंधती रेड्डी, मिनू मनी, पूनम यादव, स्नेहा दिप्ती, तानिया भाटिया, तितास साधू,जसिया अख्तर, अपर्णा मोंडल, तारा नोरीस.

  • रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर -

स्मृती मानधना (कर्णधार), ऋचा घोष, एलिसा पेरी, रेणूका सिंग, सोफी डिवाईन, हिदर नाईट, मेगन शट, कनिका अहुजा, डेन वॅन निकर्क, एरिन बर्न्स, प्रीती बोस, कोमल झंझाड, आशा शोभना, दिशा कासट, इंद्रानी रॉय, पुनम खेमनार, सहाना पवार, श्रेयंका पाटील.

  • गुजरात जायंट्स -

ऍश्ले गार्डनर, बेथ मुनी (कर्णधार), जॉर्जिया वेरहॅम, स्नेह राणा, ऍनाबेल सदरलँड, डिएंड्रा डॉटिन, सोफिया डंकली, सुष्मा वर्मा, तनुजा कन्वर, हर्लिन देओल,ऐश्वनी कुमारी, दयालन हेमलथा, मानसी जोशी, मोनिका पटेल, शब्बीनेनी मेघना, हर्ली गाला, परुनिका सिसोदिया, शबनम शकिल.

  • युपी वॉरियर्स -

दीप्ती शर्मा, सोफी एक्लेस्टोन, देविका वैद्य, ताहलिया मॅग्रा, शबनिम इस्माईल, ग्रेस हॅरिस, एलिसा हेली (कर्णधार), अंजली सारवाणी, राजेश्वरी गायकवाड, श्वेता सेहरावत, किरण नवगिरे, लॉरेन बेल, लक्ष्मी यादव, पार्श्वी चोप्रा, एस यशश्री, सिमरन शेख.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com