White Card In Football: फुटबॉलमधील 'व्हाईट कार्ड'चा अर्थ काय? इतिहासात पहिल्यांदाच वापर...

बेनफिका विरूद्ध स्पोर्टिंग लिस्बन सामन्यात या कार्डचा झाला वापर
White Card In Football
White Card In FootballDainik Gomantak

White Card In Football: फुटबॉलमध्ये अती आक्रमक, धोकादायक आणि धसमुसळा खेळ करणाऱ्या खेळाडूंना यलो किंवा रेड कार्ड दाखवले जात असते. पण आता फुटबॉलमध्ये व्हाईट कार्डचाही वापर केला गेला आहे.

फुटबॉलच्या इतिहासात पहिल्यांदाच पांढऱ्या कार्डचा (White Card) वापर करण्यात आला. व्हाईट कार्ड हा एक फुटबॉलमध्ये नव्याने सुरू करण्यात आलेला आहे. निष्पक्ष खेळ आणि खिलाडूवृत्तीला प्रोत्साहन देण्यासाठी हे कार्ड सुरू करण्यात आले आहे.

White Card In Football
ICC Test Team 2022: एकट्या पंतचा भारताला आधार! असा आहे आयसीसीचा कसोटी संघ

बेनफिका आणि स्पोर्टिंग लिस्बन यांच्यातील महिला चषकाच्या उपांत्यपूर्व फेरीचा सामना पोर्तुगालमध्ये शनिवारी (21 जानेवारी) झाला. या सामन्यात पहिल्यांदाच व्हाईट कार्ड दाखविण्यात आले. हा समस्त फुटबॉल विश्वासाठी ऐतिहासिक क्षण होता. एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या बेनफिका आणि स्पोर्टिंग लिस्बन यांच्यातील हा सामना बेनफिकाच्या बाजूने जात होता. बेनफिका संघ 3-0 ने आघाडीवर असताना पांढरे कार्ड दाखवले गेले.

पांढरे कार्ड का दाखवले?

व्हाईट कार्ड हा फुटबॉलमध्ये चांगला खेळ आणि खिलाडूवृत्तीला चालना देण्यासाठी सादर केलेला एक नवीन उपक्रम आहे. व्हाईट कार्डचा नेमका उद्देश काय आणि ते कधी मिळते हे अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. जे खेळाडू पिवळे कार्ड मिळूनही पंच/अधिकाऱ्यांची अवज्ञा करतील आणि मैदानावर खिलाडुवृत्ती दाखवणार नाहीत, अशा खेळाडुंना इशारा म्हणून हे कार्ड वापरण्यात येणार असल्याचे समजते.

White Card In Football
IND vs NZ: शुभमन गिलने करूनच दाखवलं! आजपर्यंत कोणत्याच भारतीयाला न जमलेला रेकॉर्ड नावावर

या सामन्यात पूर्वार्ध संपल्यानंतर, बेंचवरील कोणीतरी आजारी पडल्याने त्याच्या मदतीसाठी दोन्ही संघांचे वैद्यकीय कर्मचारी पोहोचले. या भावनेसाठी रेफ्रींनी वैद्यकीय संघाला पांढरे कार्ड दाखवून सन्मानित केले.

रेड कार्ड दाखवलेल्या खेळाडुला त्याच क्षणी मैदानाबाहेर जावे लागते. त्याला त्या सामन्यात खेळता येत नाही. तसेच पुढील सामन्यातही त्याला खेळता येत नाही. तर यलो कार्डबाबत खेळाडुला पहिल्यांदा वॉर्निंग म्हणून यलो कार्ड दाखवले जाते आणि दुसऱ्यांदा यलो कार्ड मिळाले की दोन यलो कार्डचे मिळून रेड कार्डमध्ये रूपांतर होते, त्यामुळे तत्क्षणी संबंधित खेळाडुला मैदान सोडावे लागते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com