'या' भारतीय क्रिकेटपटूवर Wasim Akram फिदा, म्हणाला- वर्ल्ड कपमध्ये...

Wasim Akram On Hardik Pandya: पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू वसीम अक्रमने भारतीय वेगवान गोलंदाज आणि फलंदाज हार्दिक पांड्याचे कौतुक केले आहे.
Wasim Akram
Wasim AkramDainik Gomantak

Wasim Akram On Hardik Pandya: पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू वसीम अक्रमने भारतीय वेगवान गोलंदाज आणि फलंदाज हार्दिक पांड्याचे कौतुक केले आहे.

आशिया कपमध्ये हार्दिक पांड्याने केलेली दमदार गोलंदाजी पाहता वसीम अक्रमने हे वक्तव्य केले आहे. रविवारी झालेल्या आशिया कपच्या अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेचा 10 गडी राखून पराभव करत विजेतेपद पटकावले.

हार्दिक पांड्याने 3 बळी घेतले

दरम्यान, हार्दिकने श्रीलंकेविरुद्ध (Sri Lanka) खेळल्या गेलेल्या आशिया कपच्या अंतिम सामन्यात तीन महत्त्वपूर्ण विकेट घेतल्या. त्याने दुनित वेलालागे, प्रमोद मदुशन आणि मथिशा पाथिराना यांची विकेट घेतली.

अशाप्रकारे भारतीय संघाने प्रथम गोलंदाजी करताना श्रीलंकेचा संघ अवघ्या 50 धावांत आटोपला. या सामन्यात मोहम्मद सिराजने एकूण 6 आणि जसप्रीत बुमराहने 1 बळी घेतला.

अक्रम काय म्हणाला?

एका मुलाखतीत अक्रमने सांगितले की, 2023 च्या आयसीसी क्रिकेट विश्वचषकात हार्दिक हे टीम इंडियाचे "मुख्य शस्त्र" असेल. रोहित शर्मा (Rohit Sharma) अँड कंपनी विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार असेल, असेही तो पुढे म्हणाला. एकदिवसीय विश्वचषक 2023 भारतात 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर दरम्यान खेळवला जाईल.

Wasim Akram
Hardik Pandya: 'चूक माझीच की मी...', हार्दिकने सांगितले विंडिजविरुद्ध लाजिरवाण्या पराभवाचे कारण

अक्रमने कुलदीप यादवचेही कौतुक केले

आशिया कपमधील चमकदार कामगिरीबद्दल वसीम अक्रमने स्टार फिरकीपटू कुलदीप यादवचेही कौतुक केले. अक्रम पुढे म्हणाला की, टीम इंडियाने त्यांच्याकडे मजबूत संघ असल्याची खात्री केली आहे.

Wasim Akram
Hardik Pandya: 'तू धोनी होऊ शकत नाही!', हार्दिकने विजयी षटकार मारला, तरीही का भडकले चाहते?

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर झाला आहे

यासोबतच, एकदिवसीय विश्वचषक 2023 पूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.

कर्णधार रोहित आणि मुख्य सिलेक्टर्स अजित आगरकर यांनी तीन सामन्यांच्या मालिकेसाठी दोन संघ जाहीर केले आहेत. पहिल्या दोन सामन्यांमध्ये रोहित आणि विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली आहे. पहिल्या दोन सामन्यात रोहितच्या जागी केएल राहुल कर्णधार असेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com