28 ऑगस्टला कोहली रचणार इतिहास, असं करणारा तो पहिला भारतीय तर...

भारतीय क्रिकेट संघ आशिया चषक 2022 मध्ये पहिला सामना 28 ऑगस्ट रोजी दुबईच्या मैदानावर पाकिस्तान विरुद्ध खेळणार आहे.
Virat Kohli
Virat KohliDainik Gomantak
Published on
Updated on

भारतीय क्रिकेट संघ (Indian Cricket Team) आशिया चषक 2022 मध्ये पहिला सामना 28 ऑगस्ट रोजी दुबईच्या मैदानावर पाकिस्तान विरुद्ध खेळणार आहे तर या सामन्यात विराट कोहली (Virat Kohli) इतिहास रचणार आहे. माजी कर्णधार विराट कोहली आशिया चषक स्पर्धेतील पहिला सामना खेळण्यासाठी बाहेर पडताच आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये किमान 100 किंवा त्याहून अधिक सामने खेळणारा आशिया आणि भारतातील पहिला खेळाडू बनणार आहे. (Virat Kohli will create history on August 28 becoming the first Indian and the second player in the world to do so)

Virat Kohli
Asia Cup 2022: BCCI ने केली टीम इंडियाची घोषणा, KL राहुलचे पुनरागमन

कोहलीची कामगिरी,

आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या (International cricket) तिन्ही फॉरमॅटमध्ये 100 किंवा त्याहून अधिक सामने खेळण्याचा विक्रम न्यूझीलंडच्या रॉस टेलरच्या नावावर आहे, ज्याने कसोटीत 112 सामने, वनडेमध्ये 236 आणि टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 102 सामने खेळले आहेत आणि त्याच्यापाठोपाठ विराट कोहली आहे, ज्याने आतापर्यंत 102 कसोटी, 262 एकदिवसीय आणि 99 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. विराट बऱ्याच दिवसांनी टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळताना चाहत्यांना दिसून येणार आहे.

विराट कोहली रचणार इतिहास,

विराट कोहलीसाठी हा क्षण खास असेल, कारण आतापर्यंत कोणत्याही भारतीय क्रिकेटपटूला एवढी मोठी कामगिरी करता आलेली नाहीये. जरी रोहित शर्माने T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने खेळण्याचा विश्वविक्रम केला पण एकदिवसीय क्रिकेटमध्ये तो 100 हून अधिक सामने खेळण्यात यशस्वी ठरला आहे पण कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या सामन्यांची संख्या केवळ 45 आहे, त्यामुळे तो या स्थानावर आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com