‘गोवा बास्केटबॉलच्या अध्यक्षपदी शेन डायस यांची बिनविरोध निवड

त्यांच्या नेतृत्वाखालील संघटनेची नवी कार्यकारिणी 2021 ते 2025 या कालावधीसाठी कार्यरत असेल.
Goa Basketball Association
Goa Basketball AssociationDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोवा बास्केटबॉल संघटनेच्या (Goa Basketball Association) अध्यक्षपदी शेन डायस (Shane Dias) यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यांच्या नेतृत्वाखालील संघटनेची नवी कार्यकारिणी 2021 ते 2025 या कालावधीसाठी कार्यरत असेल.

शेन हे गोवा बास्केटबॉल संघटनेचे माजी खजिनदार असून केजेस आणि सोनिक्स या बास्केटबॉल क्लबचे प्रमोटर आहेत. संघटनेची आमसभा शनिवारी दोना पावला येथील द इंटरनॅशनल सेंटर येथे झाली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी ॲड. डेन रोझारियो (Adv. Dan Rosario) यांनी निवडणूक प्रक्रिया पार पाडली. आमसभेस निरीक्षक या नात्याने भारतीय बास्केटबॉल महासंघाचे संयुक्त सचिव टी. चेंगालराया नायडू (बाबू), गोवा क्रीडा प्राधिकरणाचे कार्यक्रम संचालक महेश रिवणकर, गोवा ऑलिंपिक असोसिएशचे अखिल पर्रीकर उपस्थित होते.

Goa Basketball Association
Goa: भारतीय फुटबॉल दर्जा चव्हाट्यावर

गोवा बास्केटबॉल संघटनेची व्यवस्थापकीय समिती

अध्यक्ष ः शेन डायस, उपाध्यक्ष ः मारिया हेलेना पिंटो, सुमीत तेंडुलकर, लुईस गोम्स, सचिव ः फादर रालिन गोम्स, खजिनदार ः जेम्स आंद्राद, संयुक्त सचिव ः रॉयस्टन कॉस्ता, सदस्य ः ज्योनिता फर्नांडिस, सिडनी फुर्तादो, संदीप हेबळे, अमेय जोशी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com