Tunisia Vs France: फिफा फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेत बुधवारी ग्रुप डी मधील फ्रान्स विरू्दध ट्युनिशिया सामन्याने फुटबॉलमधील थरार काय असतो ते दाखवून दिले. ट्युनिशियाने फ्रान्सवर 1-0 गोलफरकाने मात केली. तथापि, फ्रान्स पराभूत झाला असला तरी फ्रान्सचे गुण जास्त असल्याने फ्रान्स यापुर्वीच राऊंड ऑफ 16 फेरीत पोहचला आहे, मात्र ट्युनिशियाला गुण कमी असल्याने स्पर्धेबाहेर पडावे लागले.
(FIFA Football WorldCup 2022)
पुर्णवेळेत ट्युनिशियाने फ्रान्सवर 1-0 अशी आघाडी घेतली होती. भरपाई वेळेत सामना संपायला अवघे 10 सेकंद असताना फ्रान्सने गोल नोंदवला आणि ट्युनिशियाच्या गोटात सन्नाटा पसरला. तथापि, हा गोल ज्या ग्रिझमन याने नोंदवला होतो त्याची ऑफसाईड असल्याचे पंचांना व्हीएआर तंत्रज्ञानात दिसून आले. त्यामुळे फ्रान्सचा हा गोल रद्द करण्यात आला आणि त्यानंतर ट्युनिशियाच्या प्रेक्षकांनी पुन्हा एकच जल्लोष करत मैदान अक्षरशः डोक्यावर घेतले.
या सामन्यात पुर्वार्धात दोन्ही संघांना प्रतिस्पर्धी संघावर गोल करता आला नाही. पण उत्तरार्धाच्या खेळाला सुरवात झाल्यानंतर 58 व्या मिनिटाला ट्युनिशियाच्या वाहिबी खाजरी याने गोल नोंदवत ट्युनिशियाला आघाडी मिळवून दिली. पुर्णवेळेत फ्रान्सला या गोलची परतफेड करता आली नाही. भरपाई वेळेतही ग्रिझमनने गोल नोंदवला पण तो रद्द करण्यात आला. त्यामुळे ट्युनिशियाची 1-0 ही आघाडी अखेरपर्यंत कायम राहिली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.