Tristan Stubbs Triple Century: दक्षिण आफ्रिकेचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज ट्रिस्टन स्टब्सने मोठा धमाका केला आहे. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्रिशतक झळकावून मोठा विक्रम केला. ट्रिस्टन स्टब्स दक्षिण आफ्रिकेसाठी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्रिशतक झळकावणारा 11वा फलंदाज ठरला आहे. दक्षिण आफ्रिकेचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन झाल्यापासून, देशासाठी हा टप्पा गाठणारा तो आठवा फलंदाज ठरला आहे. त्याने 372 चेंडूत नाबाद 302 धावा केल्या. लवकरच त्याला कसोटी संघात नियमित खेळाडू म्हणून संधी मिळू शकते.
दरम्यान, ट्रिस्टन स्टब्स आता देशांतर्गत चार दिवसीय स्पर्धेतील डिव्हिजन 1 मध्ये पाच सामन्यांमध्ये दोन शतकांसह सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. स्टब्सने गेल्या महिन्यात भारताविरुद्धच्या नवीन वर्षाच्या कसोटीत कसोटी पदार्पण केले आणि गेल्या जुलैमध्ये श्रीलंका दौऱ्यावर गेलेल्या दक्षिण आफ्रिका A संघाचा तो भाग होता, जिथे त्याने कोलंबोमध्ये शतक झळकावले होते. त्यानंतरच त्याला वरिष्ठ संघात संधी मिळाली. आता तो संघातील त्याची जागा निश्चित करु शकतो.
पहिल्या पसंतीच्या कसोटी खेळाडूंप्रमाणे, ट्रिस्टन स्टब्सने न्यूझीलंडमध्ये कसोटी मालिका खेळण्याऐवजी SA20 लीगमध्ये खेळणे पसंत केले. मात्र, त्याच्यासाठी ही स्पर्धा यशस्वी ठरली. तीन अर्धशतकांसह एकूण 301 धावा करत सनरायझर्स इस्टर्न केपसाठी तो सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला. या हंगामात त्याचा स्ट्राइक रेट 168.15 होता. संघाने दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावले. ट्रॉफी उचलल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच त्याने रेड बॉल क्रिकेटमध्ये आश्चर्यकारक कामगिरी केली.
दुसरीकडे, 2022 मध्ये त्याला पहिल्यांदा आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळाली होती. तो मुंबई इंडियन्सकडून खेळला आणि पुढच्या मोसमातही तो मुंबई इंडियन्सचा भाग होता, पण दोन मोसमात त्याने फक्त चार सामने खेळले. आता दिल्ली कॅपिटल्सने त्याला 50 लाखांच्या मूळ किमतीत विकत घेतले आहे. यावेळी तो दिल्ली कॅपिटल्ससाठी खेळताना दिसणार आहे, कारण तो मधल्या फळीत यष्टीरक्षक फलंदाजाचा पर्याय उपलब्ध करुन देईल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.