Video: अबब! बॉलरने एकाच चेंडूत खर्च केल्या तब्बल 18 धावा, नक्की काय झालं पाहा

क्रिकेटमध्ये अनेकदा विचित्र गोष्टी घडताना दिसतात, नुकतेच एक असा सामना पाहायला मिळाला, ज्यात एकाच चेंडूवर 18 धावा निघाल्या.
Abhishek Tanwar
Abhishek Tanwar Dainik Gomantak
Published on
Updated on

Abhishek Tanwar concedes 18 runs in one ball: क्रिकेटच्या मैदानात अनेकदा अनोख्या आणि दुर्मिळ घटना घडताना दिसतात. अशीच एक घटना सध्या सुरु असलेल्या तमिळानाडू प्रीमियर लीग 2023 स्पर्धेतील सामन्यात घडली आहे. मंगळवारी (13 जून) झालेल्या चेपॉक सुपर जाईल्स विरुद्ध सलेम स्पार्टन्स संघातील सामन्यात एकाच चेंडूत तब्बल 18 धावा निघाल्या.

या सामन्यात चेपॉक संघ प्रथम फलंदाजी करत होता. यावेळी स्पार्टनचा कर्णधार अभिषेक तन्वरने डावातील सर्वात शेवटचा वैध चेंडू टाकण्याच्या प्रक्रियेदरम्या तब्बल १८ धावा खर्च केल्या.

खरंतर तन्वर तमिळनाडू प्रीमियर लीग 2022 हंगामात सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज होता. पण यंदा चेपॉकविरुद्ध खेळताना त्याने संघर्ष केला. त्याने अखेरच्या षटकात एकूण 26 धावा दिल्या. यातील 18 धावा अखेरच्या चेंडूवर आल्या. त्यामुळे चेपॉक संघाने 20 षटकात 5 बाद 217 धावा उभारल्या.

Abhishek Tanwar
Team India मध्ये वाहणार बदलाचे वारे? वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी 'या' IPL स्टार्सला मिळू शकते संधी

कशा खर्च झाल्या 18 धावा?

तन्वरने फलंदाज संजय यादवविरुद्ध डावाच्या अखेरचा चेंडू पहिल्यांदा नो बॉल टाकला. त्यामुळे चेपॉक संघाला फ्रिहीट मिळाली. त्यानंतर तन्वरने पुढचा चेंडूही नो-बॉल टाकला, ज्यावर यादवने षटकार खेचला.

त्यानंतर तिसऱ्यांदा देखील तन्वरने नो-बॉलच टाकला. ज्यावर यादवने दुहेरी धावा काढल्या. त्यामुळे या तिन्ही नो-बॉलवर मिळूनच 11 धावा आल्या होत्या. त्यानंतर जेव्हा पुन्हा तन्वरने हा चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तो वाईड ठरला.

त्यामुळे त्याला हा वैध चेंडू टाकण्यासाठी पाचव्यांदा प्रयत्न करावा लागला. अखेर त्याने अखेरचा वैध चेंडू टाकला. पण त्यावरही यादवने षटकार खेचला. त्यामुळे एकूण 18 धावा चेपॉक संघाला या चेंडूवर मिळाल्या.

Abhishek Tanwar
जड्डूने ज्या बॅटने CSK ला IPL ट्रॉफी जिंकून दिली, त्याचं काय केलं, माहितीये का? तुम्हीही कराल कौतुक

तन्वरने मान्य केली चूक

दरम्यान, तन्वरने त्याची चूक नंतर मान्य केली. त्याने म्हटले की 'मी अखेरच्या षटकाची जबाबदारी घेतो. एक वरिष्ठ गोलंदाज म्हणून चार नो-बॉल टाकणे निराशाजनक आहे.'

सामन्याबद्दल सांगायचे झाल्यास चेपॉकने हा सामना 52 धावांनी जिंकला. कारण 218 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना स्पार्टनला 20 षटकात 9 बाद 165 धावाच करता आल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com