NZ vs PAK: टीम साऊदीची जबरदस्त बॉलिंग; नावावर केला खास रेकॉर्ड!

Tim Southee Achieves Massive Milestone: न्यूझीलंड संघाने पाकिस्तानविरुद्ध विजयाने सुरुवात केली आहे.
Tim Southee
Tim Southee Dainik Gomantak
Published on
Updated on

Tim Southee Achieves Massive Milestone: न्यूझीलंड संघाने पाकिस्तानविरुद्ध विजयाने सुरुवात केली आहे. पाच सामन्यांच्या T20 मालिकेतील पहिला सामना आज (12 जानेवारी) ऑकलंडमध्ये खेळला गेला. या सामन्यात चांगली कामगिरी करताना किवी संघाने 46 धावांनी विजय मिळवला. पहिल्या T20 सामन्यातील उत्कृष्ट फलंदाजीसाठी डॅरिल मिशेलला 'प्लेअर ऑफ द मॅच' म्हणून गौरवण्यात आले. तर दुसरीकडे, अनुभवी गोलंदाज टीम साऊदीचेही कौतुक करावे तेवढे थोडे आहे.

दरम्यान, ऑकलंडमध्ये जिथे दोन्ही संघांकडून गोलंदाजांची जबरदस्त धुलाई होत होती, तेव्हाच टीम साऊदीने किफायतशीर गोलंदाजी केली. पहिल्या T20 सामन्यात त्याने एकूण चार षटके टाकली. दरम्यान, 6.25 च्या इकॉनॉमीने 25 धावा देत सर्वाधिक विकेट्स घेतल्या. मोहम्मद रिझवान, इफ्तिखार अहमद, अब्बास आफ्रिदी आणि हरिस रौफ हे त्याचे बळी ठरले. या सामन्यादरम्यान साऊदीने एक विशेष कामगिरीही केली. T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 150 बळी घेणारा तो पहिला गोलंदाज ठरला आहे. साऊदीने 2008 पासून टी-20 फॉरमॅटमध्ये किवी संघासाठी एकूण 118 सामने खेळले आहेत. दरम्यान, त्याने 115 डावांमध्ये 22.96 च्या सरासरीने 151 विकेट्स घेतल्या आहेत. साऊदीची टी-20 क्रिकेटमधील सर्वोत्तम कामगिरी 18 धावांत पाच बळी आहे.

Tim Southee
NZ-W vs PAK-W: पाकिस्तानने सामना जिंकून रचला इतिहास, न्यूझीलंडच्या भूमीवर पहिल्यांदाच केला 'हा' पराक्रम

कर्णधार केन विल्यमसन साऊदीच्या कामगिरीवर खूश

टीम साऊदीच्या सातत्यपूर्ण कामगिरीवर कर्णधार केन विल्यमसनही खूप खूश आहे. त्याच्या 16 वर्षांच्या कारकिर्दीत साऊदीचे मूल्य कधीही कमी लेखता येणार नाही, असे तो म्हणाला. तो पुढे म्हणाला की, ''टिम बराच काळ संघासोबत आहे. याचे श्रेय त्याच्या सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरीला जाते.''

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com