'या' स्टार खेळाडूने अचानक केली निवृत्ती जाहीर, कारकिर्दीत घेतले 1000 हून अधिक विकेट्स

Tim Murtagh Announces Retirement: माजी आयरिश वेगवान गोलंदाज टिम मुर्तघ याने निवृत्ती जाहीर केली आहे.
Tim Murtagh Announces Retirement
Tim Murtagh Announces RetirementDainik Gomantak

Tim Murtagh Announces Retirement: माजी आयरिश वेगवान गोलंदाज टिम मुर्तघ याने निवृत्ती जाहीर केली आहे. 23 वर्षे तो काऊंटी क्रिकेटला खेळला. मात्र, काऊंटी क्रिकेटच्या या हंगामाच्या अखेरीस टिम व्यावसायिक क्रिकेटमधून निवृत्त होणार आहे.

42 वर्षीय टिम आपला शेवटचा सामना नॉटिंगहॅमशायरविरुद्ध ट्रेंट ब्रिजमध्ये खेळणार आहे. या आठवड्यात लॉर्ड्सवर वॉर्विकशायरविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या सामन्यासाठी मिडलसेक्स संघात त्याचा समावेश करण्यात आला आहे.

दरम्यान, लॉर्ड्सवर वॉर्विकशायरविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या सामन्यासाठी टिम मुर्तघचा प्लेइंग 11 मध्ये समावेश केला जाऊ शकतो. असे झाल्यास हा सामना त्याच्या कारकिर्दीतील 264 वा प्रथम श्रेणी सामना असेल.

टिमने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत 1000 हून अधिक विकेट्स घेतल्या आहेत. तथापि, यंदाच्या हंगामाच्या सुरुवातीला प्रशिक्षक म्हणून भूमिका स्वीकारल्यानंतर, टिम मुर्तघ आता मिडलसेक्ससाठी पूर्णवेळ कोचिंग करण्यासाठी सज्ज झाला आहे.

Tim Murtagh Announces Retirement
ENG vs SL: नॅट सेव्हियर ब्रंटने झळकावले झंझावाती शतक, अशी कामगिरी करणारी ठरली पहिली महिला खेळाडू!

मुर्तघ निवृत्तीच्या वेळी म्हणाला...

क्लबने जारी केलेल्या निवेदनात टीम म्हणाला की, 'हे शब्द जवळपास दहा वर्षांपासून माझ्या मनात रुंजी घालत आहेत, पण आता त्यांना कागदावर उतरवण्याची वेळ आली आहे.

या मोसमाच्या अखेरीस मी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करत आहे, मात्र हे मी अत्यंत अभिमानाने आणि दुःखाने सांगत आहे.

25 वर्षांच्या अविश्वसनीय कारकिर्दीनंतर, क्रिकेटला (Cricket) अलविदा करण्याची वेळ आली आहे. 2007 पासून या क्लबसाठी खेळणे ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे.'

Tim Murtagh Announces Retirement
Eng vs Aus, Ashes 2023: शतक झळकावताच उस्मान ख्वाजा बनला नंबर-1 फलंदाज, विराटला सोडले मागे

टीम मुर्तघची कारकीर्द

टीम मुर्तघने त्याच्या कारकिर्दीत आतापर्यंत एकूण 1341 विकेट घेतल्या आहेत. टीमने आयर्लंडकडून एकूण 3 कसोटी, 58 एकदिवसीय आणि 14 टी-20 सामने खेळले आहेत. या कालावधीत टीमने एकूण 100 विकेट घेतल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com