T20 World Cup 2024 Full Schedule: T20 वर्ल्ड कपचे वेळापत्रक जाहीर, भारत-पाकिस्तान एकाच गटात

T20 World Cup 2024 Full Schedule: आयसीसीने यावर्षी जून-जुलैमध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक शुक्रवारी (5 जानेवारी) जाहीर केले.
T20 World Cup 2024 Full Schedule
T20 World Cup 2024 Full ScheduleDainik Gomantak
Published on
Updated on

T20 World Cup 2024 Full Schedule: आयसीसीने यावर्षी जून-जुलैमध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक शुक्रवारी (5 जानेवारी) जाहीर केले. आगामी T20 विश्वचषकात 9 जून रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात शानदार सामना रंगणार आहे. वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होणाऱ्या या स्पर्धेत एकूण 20 संघ सहभागी होणार आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) जाहीर केलेल्या पुरुषांच्या T20 विश्वचषक 2024 च्या वेळापत्रकात भारताला पाकिस्तान, आयर्लंड, यूएसए आणि कॅनडासह अ गटात ठेवण्यात आले आहे.

भारत-पाकिस्तान सामना कधी होणार?

दरम्यान, आयसीसी स्पर्धेतील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना नेहमीच चर्चेत असतो. आता उभय संघांमधील सामना 9 जून रोजी न्यूयॉर्क शहरात खेळवला जाणार आहे. क्रिकेटच्या मैदानावरील ही या वर्षातील सर्वात मोठी टक्कर असू शकते. याशिवाय, टीम इंडियाला एकूण चार साखळी सामने खेळायचे आहेत, ज्यात पाकिस्तान, आयर्लंड, यूएसए आणि कॅनडाशी सामना होणार आहे.

T20 World Cup 2024 Full Schedule
T20 World Cup 2022 Schedule: क्वालीफायरपासून ते सुपर-12 पर्यंतचे संपूर्ण शेड्यूल, वाचा एका क्लिकवर

टीम इंडियाचे साखळी सामने

5 जून- भारत विरुद्ध आयर्लंड, न्यूयॉर्क

9 जून- भारत विरुद्ध पाकिस्तान, न्यूयॉर्क

12 जून- भारत विरुद्ध यूएसए, न्यूयॉर्क

15 जून- भारत विरुद्ध कॅनडा, न्यूयॉर्क

T20 विश्वचषक 2024 चे सर्व गट

अ गट- भारत, पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा, अमेरिका.

ब गट- इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, नामिबिया, स्कॉटलंड, ओमान.

क गट- न्यूझीलंड, अफगाणिस्तान, वेस्ट इंडिज, युगांडा, पीएनजी.

ड गट- दक्षिण आफ्रिका, बांगलादेश, नेदरलँड, श्रीलंका, नेपाळ.

T20 World Cup 2024 Full Schedule
T20 World Cup 2024: 19 संघ पात्र, एका संघाची कशी होणार एन्ट्री? स्पर्धेचे स्वरुप काय असणार... जाणून घ्या

दरम्यान, या स्पर्धेच्या फॉरमॅटबद्दल बोलायचे झाल्यास सर्व संघ ग्रुप स्टेजमध्ये 4-4 सामने खेळतील. यानंतर, प्रत्येक गटातील अव्वल 2 संघ उपांत्यपूर्व फेरीत पोहोचतील. सुपर 8 च्या या बाद फेरीनंतर चार संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील. त्यानंतर उपांत्य फेरीतील दोन विजयी संघ अंतिम फेरीत आमनेसामने येतील. या स्पर्धेत एकूण 55 सामने खेळवले जाणार आहेत. 1 ते 18 जून दरम्यान ग्रुप स्टेजमध्ये 40 सामने होतील. 19 ते 24 जून दरम्यान सुपर 8 सामने होणार आहेत. 26 आणि 27 जून रोजी उपांत्य फेरीचे सामने होणार आहेत. 29 जून रोजी अंतिम सामना होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com