दिनेश कार्तिकचे कौतुक करताना गावस्कर म्हणाले....

बराच काळ भारतीय संघाबाहेर असलेल्या कार्तिकने या मोसमात आपल्या बॅटने जबरदस्त कामगिरी करत फिनिशर म्हणून स्वत:ला सिद्ध केले आहे.
Dinesh Kartik
Dinesh Kartik Dainik Gomantak
Published on
Updated on

दिनेश कार्तिकसाठी आयपीएल 2022 चा आतापर्यंतचा प्रवास अप्रतिम होता. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी फिनिशरची भूमिका बजावताना अनेक वेळा संघाला विजय मिळवून देणारा 36 वर्षीय खेळाडू पुन्हा एकदा टीम इंडियामध्ये पुनरागमन करण्यासाठी उत्सुक आहे. आगामी टी-20 विश्वचषक स्पर्धेत खेळून संघाला विजय मिळवून देण्याची इच्छा खुद्द कार्तिकने व्यक्त केली आहे. (Sunil Gavaskar impressed with Dinesh Kartik's batting in IPL)

Dinesh Kartik
फुटबॉल मॅच फिक्सिंग प्रकरणात क्राईम ब्रँचकडे तक्रार

बराच काळ भारतीय संघाबाहेर असलेल्या कार्तिकने या मोसमात आपल्या बॅटने जबरदस्त कामगिरी करत फिनिशर म्हणून स्वत:ला सिद्ध केले. कार्तिक अलीकडेच जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत समालोचन करताना एका नव्या भूमिकेत दिसला. यानंतर, आयपीएलच्या मेगा लिलावात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाने त्याला सामील केले.

Dinesh Kartik
सैनिक व्हायचे होते, नशिबाने बनवले क्रिकेटर, दिल्ली कॅपिटल्सच्या मॅचविनरची कहाणी

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये कार्तिकसोबत कॉमेंट्री करणारे अनुभवी भारतीय क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी आरसीबी क्रिकेटपटूला वर्ल्ड कपमध्ये खेळण्यासाठी पाठिंबा दिला आहे. कार्तिकचा सध्याचा फलंदाजीचा फॉर्म लक्षात घेऊन त्याची भारतीय संघात निवड करावी, असे ते म्हणाले.

गावस्कर यांनी एका वाहिनीशी संवाद साधताना सांगितले की, "गेल्या वर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपदरम्यान आम्ही एकत्र कॉमेंट्री केली होती. यादरम्यान आम्ही क्वारंटाईनमध्ये बराच वेळ घालवला होता. तो गेल्या वर्षीचा विश्वचषक खेळला नाही पण त्याने आयपीएल 2022 मध्ये ज्या प्रकारे कामगिरी केली आहे, जर मी निवडकर्ता असतो तर मी त्याला आगामी विश्वचषकासाठी निवडले असते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com