क्रिकेट विश्वात खळबळ! जगातील पहिल्या Gay क्रिकेटरने केली निवृत्तीची घोषणा; म्हणाला...

Steven Davies Announced Retirement: जगातील पहिल्या गे क्रिकेटरने 20 वर्षांच्या कारकिर्दीनंतर निवृत्तीचा निर्णय घेतला आहे.
Steven Davies Announced Retirement
Steven Davies Announced RetirementDainik Gomantak
Published on
Updated on

Steven Davies Announced Retirement: जगातील पहिल्या गे क्रिकेटरने 20 वर्षांच्या कारकिर्दीनंतर निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. हा खेळाडू दुसरा कोणी नसून इंग्लंडचा माजी यष्टिरक्षक स्टीव्हन डेव्हिस आहे.

स्टीव्हन डेव्हिसने हंगामाच्या शेवटी निवृत्तीचा निर्णय जाहीर केला आहे. डेव्हिस 20 वर्षांच्या कारकिर्दीत वूस्टरशायर, सरे आणि सॉमरसेटसाठी खेळला आणि इंग्लंडसाठी एकूण 13 आंतरराष्ट्रीय सामने खेळला.

जगातील पहिल्या Gay क्रिकेटरने निवृत्तीची घोषणा केली

2011 मध्ये, स्टीव्हन डेव्हिस इंग्लंडच्या (England) ऑस्ट्रेलियाच्या यशस्वी अॅशेस दौऱ्याचा भाग होता. या दौऱ्यानंतरच स्टीव्हन डेव्हिस हा समलैंगिक म्हणून समोर येणारा पहिला व्यावसायिक क्रिकेटपटू ठरला. डेव्हिसने वूस्टरशायरसाठी चमकदार कामगिरी केली.

2008-09 मध्ये कॅरिबियनमध्ये तो इंग्लंडसाठी पहिला T20 सामना खेळला होता. या वर्षी त्याने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये वनडे क्रिकेटमध्ये (ODI Cricket) पदार्पण केले होते. जरी त्याला इंग्लंडकडून कसोटीत खेळण्याची संधी मिळाली नाही.

स्टीव्हन डेव्हिसने निवृत्तीच्या वेळी म्हणाला...

स्टीव्हन डेव्हिस म्हणाला की, 'सॉमरसेटसोबतच्या आठवणी माझ्या नेहमी लक्षात राहतील. आम्ही काही ट्रॉफी जिंकू शकलो आणि चांगले रेड बॉल क्रिकेट खेळलो. कोविडच्या आसपास आम्ही प्रभावी क्रिकेट खेळलो, जे माझ्या स्मरणात दीर्घकाळ राहील.'

स्टीव्हन डेव्हिसने इंग्लंडसाठी 8 एकदिवसीय सामन्यांमध्ये 244 धावा आणि 5 टी-20 सामन्यात 102 धावा केल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com