SA vs AUS: बाबो! द. आफ्रिकेने तब्बल सातव्यांदा गाठला 400 धावांचा आकडा, क्लासेनचं 13 सिक्ससह तुफानी दीडशतक

Heinrich Klaasen : दक्षिण आफ्रिकने तब्बल 416 धावांचा डोंगर उभारल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा दारुण पराभव केला.
David Millar - Heinrich Klaasen
David Millar - Heinrich KlaasenDainik Gomantak

South Africa score 416 runs against Australia in 4th ODI at Centurion:

दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात सेंच्युरियनला वनडे मालिकेतील चौथा सामना झाला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने दमदार आणि आक्रमक फलंदाजी केली. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेने तब्बल 164 धावांनी विजय मिळवला असून मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधली आहे.

या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 5 बाद 416 धावा उभारल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या नावावर मोठा विश्वविक्रम नोंदवला गेला आहे.

दक्षिण आफ्रिकेने वनडेत तब्बल सातव्यांदा 400 धावांचा टप्पा पार केला आहे. हा विश्वविक्रम आहे. दक्षिण आफ्रिकेने वनडेत सर्वाधिकवेळा 400 धावांचा टप्पा पार करणाऱ्या संघांच्या यादीत भारताला मागे टाकत अव्वल क्रमांक मिळवला आहे.

भारताने वनडेत 6 वेळा 400 धावांचा टप्पा पार केला आहे. त्यापाठोपाठ इंग्लंड असून त्यांनी 5 वेळा 400 धावांचा टप्पा पार केला आहे. विशेष म्हणजे दक्षिण आफ्रिका, भारत आणि इंग्लंड हे तिन्ही संघ 400 धावांचा टप्पा पार केल्यानंतर पराभूत झालेले नाहीत.

वनडेत सर्वाधिकवेळा 400 धावांचा टप्पा पार करणारे संघ -

  • 7 वेळा - दक्षिण आफ्रिका

  • 6 वेळा - भारत

  • 5 वेळा - इंग्लंड

  • 2 वेळा - श्रीलंका

  • 2 वेळा - ऑस्ट्रेलिया

  • 1 वेळा - न्यूझीलंड

  • 1 वेळा - झिम्बाब्वे

David Millar - Heinrich Klaasen
Glenn Maxwell: मॅक्सवेल झाला 'बापमाणूस'! पत्नी विनीने दिला मुलाला जन्म, नावाचाही केला खुलासा

क्लासेनचं तुफानी दीडशतक

या सामन्यात दक्षिण आफ्रिकेची सुरुवात चांगली झाली होती. क्विंटन डी कॉकने 45 धावा आणि रस्सी वॅन डर द्युसेनने 62 धावांची खेळी केली होती. तसेच रिझा हेंड्रिक्सने 28 धावा केलेल्या, तर कर्णधार एडेन मार्करम 8 धावांवर माघारी परतला होता. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या 34.4 षटकात 4 बाद 194 धावा झालेल्या.

मात्र, त्यानंतर हेन्रिक क्लासेनने टॉप गिअर टाकला आणि तुफानी फलंदाजी करण्यास सुरुवात केली. त्याला डेव्हिड मिलरची चांगली साथ मिळाली. या दोघांनी चौकार षटकारांचा पाऊस पाडत केवळ 94 चेंडूत 222 धावांची भागीदारी रचली.

यादरम्यान क्लासेनने 77 चेंडूत दीडशतक पूर्ण केले. त्यामुळे त्याची ही खेळीत वनडेत सर्वात कमी डावात केलेली चौथ्या क्रमांकाची दीडशतकी खेळी ठरली.

या यादीत अव्वल क्रमांकावर एबी डिविलियर्स असून त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध 2015 मध्ये 64 चेंडूत दीड शतक केले होते, तर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर जोस बटलर असून क्याने 2022 मध्ये नेदरलँड्स विरुद्ध 65 चेंडूत आणि 2019 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध 76 चेंडूत दीडशतक केले होते.

दरम्यान, हेन्रिक क्लासेन डावाच्या अखेरच्या चेंडूवर बाद झाला. त्याने 83 चेंडूत 13 चौकार आणि 13 षटकारांसह 174 धावा केल्या. तसेच मिलरने 45 चेंडूत 6 चौकार आणि 5 षटकारांसह 82 धावांची नाबाद खेळी केली.

David Millar - Heinrich Klaasen
IND vs BAN: शुभमन गिलचं शतक व्यर्थ! भारताचा पराभव करत बांगलादेशने केला शेवट गोड

ऑस्ट्रेलियाचा पराभव

दक्षिण आफ्रिकेने ठेवलेल्या 417 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाला 34.5 षटकात सर्वबाद 252 धावाच करता आल्या. ऑस्ट्रेलियाकडून ऍलेक्स कॅरे 99 धावांवर बाद झाला. त्याच्या व्यतिरिक्त केवळ टीम डेव्हिडला 30 धावांचा टप्पा पार करता आला. त्याने 35 धावांची खेळी केली.

दक्षिण आफ्रिकेकडून लुंगी एन्गिडीने 4 विकेट्स घेतल्या, तर कागिसो रबाडाने 3 विकेट्स घेतल्या. तसेच मार्को यान्सिन आणि केशव महाराज यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com