सौरव गांगुलीचे क्रिकेटमध्ये पुनरागमन, 'या' सामन्यात भूषवणार कर्णधारपद

हा सामना भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षाच्या समारंभाला समर्पित असणार आहे.
Sourav Ganguly
Sourav GangulyDainik Gomantak
Published on
Updated on

भारताला या वर्षी स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण होत आहेत तर हा सोहळा खास बनवण्यासाठी देशात अमृत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर एका खास क्रिकेट सामन्याचे देखील आयोजन करण्यात येणार आहे. हा सामना लिजेंड्स क्रिकेट लीग अंतर्गत खेळवला जाणार आहे. (Sourav Ganguly return to cricket will hold the captaincy in this match)

Sourav Ganguly
Arjun Tendulkar मुंबई सोडणार, आता गोवेकर म्हणून ओळखला जाणार...

तसे, ही लीग 16 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे पण त्याच्या एक दिवस आधी म्हणजेच 15 सप्टेंबरला इंडिया महाराज आणि सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखालील वर्ल्ड जायंट्स यांच्यात सामना खेळला जाणार आहे. हा सामना भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षाच्या समारंभाला समर्पित असणार आहे अशी आयोजकांनी शुक्रवारी माहिती दिली आहे.

एलएलसीचे उपायुक्त रवी शास्त्री यांनी एका निवेदनात म्हटले की, “आम्ही आमचे स्वातंत्र्याचे 75 वे वर्ष साजरे करत आहोत हा आमच्यासाठी खुप अभिमानाचा क्षण आहे. या वर्षी लीगच्या स्वातंत्र्याचा 75 वा वर्धापन दिन आम्ही साजरा करत आहोत हे सांगताना मला अत्यंत आनंद होत आहे आणि भारताला समर्पित करण्याचा निर्णय घेतला आहे.

इंडिया महाराजाचे नेतृत्व भारताचे माजी कर्णधार आणि भारतीय क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav ganguly) करणार आहेत तर वर्ल्ड जायंट्सचे नेतृत्व इंग्लंडचा 2019 विश्वचषक विजेता कर्णधार इऑन मॉर्गन करेल. एलएलसीची दुसरी स्पर्धा या विशिष्ट सामन्याच्या दुसऱ्या दिवशी 16 सप्टेंबर रोजी सुरू होणार आहे. या स्पर्धेमध्ये चार संघ सहभागी होणार असून 22 दिवसांत 15 सामने खेळवले जाणार आहेत.

Sourav Ganguly
FIFA World Cup 2022 या दिवशी होणार सुरू, कतार संघाच्या सामन्याने होणार सुरुवात

लिजेंड्स लीग क्रिकेटचा पहिला सीझन या वर्षी जानेवारीमध्ये मस्कत येथे इंडिया महाराजा, वर्ल्ड जायंट्स आणि एशिया लायन्स (asia lions) या तीन संघांमध्ये खेळला गेला आणि त्यात एकूण 7 सामने झाले तर सीझन 2 मध्ये चार संघ भाग घेणार आहेत.

इंडिया महाराजा: (India maharajas)

सौरव गांगुली (कॅप्टन), वीरेंद्र सहवाग, युसूफ पठान, मोहम्मद कैफ, एस. बद्रीनाथ, इरफान पठान, पार्थिव पटेल, स्टुअर्ट बिन्नी, एस. श्रीसंथ, हरभजन सिंह, नमन ओझा, अशोक डिंडा, प्रज्ञान ओझा, अजय जडेजा, आरपी सिंह, जोगिन्दर शर्मा, रीतेंदर सिंह सोढ़ी.

वर्ल्ड जायटंस: (world giants)

ऑयन मोर्गन (कॅप्टन), लेंडल सिमंस, हर्शल गिब्स, जैक कालिस, सनथ जयसूर्या, मैट प्रायर, नाथन मैक्कुलम, जोंटी रोड्स, मुथैया मुरलीधरन, डेल स्टेन, हैमिल्टन मसाकाद्जा, मशरफे मोर्ताजा, असगर अफगान, मिचेल जॉनसन, ब्रेट ली, केविन ओ’ ब्रायन, दिनेश रामदीन.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com