Goa Professional League : साळगावकर, एफसी गोवा, चर्चिल ब्रदर्सचे विजय

अनुक्रमे धेंपो, स्पोर्टिंग, कळंगुट असोसिएशचा पराभव
Jyoburn Cardoz Man of the Match Award
Jyoburn Cardoz Man of the Match AwardDainik Gomantak

Goa Professional League : गोवा प्रोफेशनल लीगच्या सुपर लीग फेरीत साळगावकर एफसी, एफसी गोवा व चर्चिल ब्रदर्सने सोमवारी शानदार विजयासह पूर्ण तीन गुणांची कमाई केली.

वास्को येथील टिळक मैदानावर साळगावकरने धेंपो स्पोर्टस क्लबला 1-0 असे निसटते हरविले. सामन्याच्या 70व्या मिनिटास बदली खेळाडू फेझर गोम्स याने केलेला गोल साळगावकर एफसीसाठी निर्णायक ठरला. कृष्णनाथ शिरोडकर सामन्याचा मानकरी ठरला.

एला-जुने गोवे येथील मैदानावर एफसी गोवाने स्पोर्टिंग क्लबला 4-2 असे नमविले. सामन्याचा मानकरी ठरलेला सेल्जिओ डायस याने पूर्वार्धात दोन गोल केले. त्याने अनुक्रमे 36 व 44व्या मिनिटास गोल नोंदविल्यामुळे विश्रांतीला एफसी गोवा संघ 2-0 असा आघाडीवर होता.

Jyoburn Cardoz Man of the Match Award
ISL Football: मुंबई सिटीसमोर बंगळूरला रोखण्याचे आव्हान

61व्या मिनिटास लॉईड कार्दोझ याने स्पोर्टिंगची पिछाडी कमी केली. व्हेलरॉय फर्नांडिसने 82व्या मिनिटास गोल केल्यामुळे एफसी गोवाची आघाडी 3-1 अशी वाढली. लगेच 86व्या मिनिटास रोहन रॉड्रिग्जने गोल नोंदवून स्पोर्टिंगच्या पिछाडीचे अंतर 2-3 असे केले. अखेर 90+5व्या मिनिटास जॉर्डन बोर्जिसच्या गोलमुळे एफसी गोवाच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले.

म्हापसा येथील धुळेर स्टेडियमवर चर्चिल ब्रदर्सने कळंगुट असोसिएशनला 2-1 असे निसटते हरविले. इंज्युरी टाईममध्ये दोन्ही संघांनी गोल केल्यामुळे रंगत वाढली. ज्योबर्न कार्दोझ याने 55व्या मिनिटास चर्चिल ब्रदर्सला आघाडी मिळवून दिली.

Jyoburn Cardoz Man of the Match Award
दक्षिण गोव्यातील रस्ता अपघातांवर तोडगा काढा; Goa Pradesh Youth Congressची मागणी

हा गोलच निर्णायक ठरेल असे वाटत असताना 90+1व्या मिनिटास एडवर्ड सौझा याने चर्चिल ब्रदर्ससाठी आणखी एक गोल केला, तर 90+3व्या मिनिटास साईश हळर्णकर याने पेनल्टी गोलवर कळंगुटची पिछाडी एका गोलने कमी केली. चर्चिल ब्रदर्सचा ज्योबर्न सामन्याचा मानकरी ठरला.

साळगावकर संघ अव्वल स्थानी

साळगावकर एफसीचे आता 24 गुण झाले असून त्यांना अव्वल स्थान मिळाले आहे. पराभवामुळे स्पोर्टिंग क्लब व कळंगुट असोसिएशनचे प्रत्येकी 21 गुण कायम राहिले. धेंपो क्लबच्या 20 गुणांत फरक पडला नाही, तर एफसी गोवाचे 19, तर चर्चिल ब्रदर्सचे 17 गुण झाले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com