IND vs PAK: रोहित शर्माने अंपायरला का दाखवली पॉवर? हार्दिकला सांगितलं खरं कारण, पाहा Video

Rohit Sharma: पाकिस्तानविरुद्ध फलंदाजी करत असताना रोहितने पंचांना बायसेप्स का दाखवले होते, याबद्दलचे कारण स्पष्ट केले आहे.
India vs Pakistan | Rohit Sharma - Hardik Pandya
India vs Pakistan | Rohit Sharma - Hardik PandyaBCCI

Rohit Sharma Explained Hardik Pandya why he show biceps to Umpire during India vs Pakistan ICC Cricket World Cup 2023:

भारतीय क्रिकेट संघाने शनिवारी पाकिस्तानविरुद्ध वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत 7 विकेट्सने विजय मिळवला. भारताचा हा यंदाच्या स्पर्धेतील सलग तिसरा विजय ठरला आहे. भारताच्या या विजयात कर्णधार रोहित शर्माने अर्धशतकी खेळी करत मोलाचा वाटा उचलला. तसेच भारतीय गोलंदाजांची कामगिरीही महत्त्वाची ठरली.

दरम्यान, या सामन्यात फलंदाजी करत असताना एका क्षणी षटकार मारल्यानंतर रोहित मैदानावरील पंच मराईस इरास्मस यांना त्याचे बायसेप्स दाखवताना दिसला होता.

याबद्दल त्याने सामन्यानंतर हार्दिक पंड्याशी बोलताना खुलासा केला आहे. बीसीसीआयने सामन्यानंतरचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये हार्दिक भारतीय संघातील खेळाडूंशी चर्चा करताना दिसत आहे.

India vs Pakistan | Rohit Sharma - Hardik Pandya
World Cup 2023: रोहितचे आक्रमण अन् गोलंदाजांची कमाल, भारताच्या पाकिस्तानविरुद्धच्या विजयाची 4 कारणे

यावेळी हार्दिकने रोहितला त्याने बायसेप्स का दाखवले, याबद्दल विचारले. त्यावर रोहित म्हणाला, 'इरास्मसने मला विचारले होते की तू इतके मोठे षटकार कसे मारत आहे. तुझ्या बॅटमध्ये काहीतरी आहे का? त्यावर मी म्हणाला, ही बॅट नाही, माझी पॉवर आहे.' यानंतर रोहित आणि हार्दिक दोघेही हसायला लागले.

तसेच रोहित त्याच्या खेळाबद्दल म्हणाला, 'मी गेल्या दोन वर्षापासून अशी फलंदाजी करण्याचा प्रयत्न करत होतो. खेळपट्टी खूप चांगली होती. मला माझे शॉट्स खेळायचे होते. आपल्या संघात पारंपारिक फटके खेळणारे अनेक खेळाडू आहेत, त्यामुळे कोणालातरी थोडा खेळ बदलण्याची गरज होती.'

दरम्यान, हार्दिक रोहितनंतर मोहम्मद सिराज, रविंद्र जडेजा आणि जसप्रीत बुमराहलाही भेटला. यावेळी जडेजा फोनवर बोलत होता. पण हार्दिक त्याच्याशी बोलायला आल्यानंतर त्यानेही फोन लगेच कट केला. यानंतर भारतीय खेळाडू एकमेकांची मस्करी करतानाही दिसले. त्याचबरोबर सिराज आणि हार्दिक बुमराहचे कौतुक करतानाही दिसले.

India vs Pakistan | Rohit Sharma - Hardik Pandya
World Cup 2023: 12 वर्षे, 5 भारतीय गोलंदाज अन् 2 विकेट्स, IND vs PAK सामन्यात घडला खास योगायोग

या सामन्यात पाकिस्तानने भारतासमोर 192 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग भारताने 30.2 षटकात 3 विकेट्स गमावत पूर्ण केला. भारताकडून कर्णधार रोहित शर्माने सर्वाधिक 86 धावांची खेळी केली. त्याने 63 चेंडूत ही खेळी करताना 6 चौकार आणि 6 षटकार मारले. तसेच श्रेयस अय्यरनेही 53 धावांची नाबाद खेळी केली.

तत्पुर्वी भारताच्या गोलंदाजांनी शानदार कामगिरी केली होती. भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानला 42.5 षटकातच 191 धावांवर रोखले होते. पाकिस्तानकडून कर्णधार बाबर आझमने सर्वाधिक 50 धावांची खेळी केली. तसेच मोहम्मद रिझवानने 49 धावा केल्या.

भारताकडून गोलंदाजी करताना जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, हार्दिक पंड्या, कुलदीप यादव आणि रविंद्र जडेजा यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com