Under 14 Cricket : भारतीय क्रिकेटमधील ‘द वॉल’, आता प्रशिक्षक असलेले महान क्रिकेटपटू राहुल द्रविड यांचा पुत्र अन्वय कर्नाटकच्या 14 वर्षांखालील क्रिकेट संघाचे नेतृत्व करत असून तो यष्टिरक्षकही आहे. त्याने बुधवारी गोव्याविरुद्ध दक्षिण विभागीय 14 वर्षांखालील क्रिकेट सामन्यात शानदार अर्धशतक केले.
दक्षिण विभागीय 14 वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत केरळमधील थोडुपुझा येथे बुधवारपासून दोन दिवसीय सामन्यास सुरवात झाली. कर्नाटकने पहिल्या डावात 9 बाद 300 धावा केल्या.
अन्वय याने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी केली. 153 चेंडूंचा सामना करताना त्याने नऊ चौकारांच्या मदतीने 74 धावा केल्या. गोव्याचा फिरकी गोलंदाज अर्णव पाटील याच्या गोलंदाजीवर रेयान केरकर याने अन्वयचा झेल पकडला.
कर्नाटकच्या कर्णधाराने सलामीचा फलंदाज ध्रुव कृष्णन (96, 174 चेंडू, 14 चौकार) याच्यासमवेत दुसऱ्या विकेटसाठी 161 धावांची भागीदारी केली. ध्रुव यालाही अर्णव यानेच त्रिफळाचीत बाद केले.
संक्षिप्त धावफलक
कर्नाटक, पहिला डाव : 90 षटकांत 9 बाद 300 (ध्रुव कृष्णन 96, आयुष पाटील 14, अन्वय द्रविड 74, जे. सुकृत 47, ए. रोहित 26, एच. कार्तिक नाबाद 10, शमिक कामत 17-3-53-1, अथर्व देविदास 15-0-59-2, अर्णव पाटील 18-0-53-2, जय कांगुरी 14-3-50-2, स्वयम माशेलकर 18-7-35-0, रेयान केरकर 8-1-29-0).
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.