पणजी जिमखान्याने अंतिम लढतीत जिंकला बांदोडकर करंडक

अंतिम लढतीत इक्बाल इलेव्हनवर 46 धावांनी मात, सूरज डोंगरे सामन्याचा मानकरी
Panajim cricket Team
Panajim cricket TeamDainik gomantak
Published on
Updated on

पणजी : यजमान पणजी (Panaji) जिमखान्याने अंतिम लढतीत इक्बाल इलेव्हनवर 46 धावांनी विजय नोंदवून बांदोडकर करंडक बाद फेरी टी-20 क्रिकेट (Cricket) स्पर्धा जिंकली. विजयी संघाचा सूरज डोंगरे मानकरी ठरला.

स्पर्धेची अंतिम लढत शुक्रवारी कांपाल येथील भाऊसाहेब बांदोडकर मैदानावर झाली. पणजी जिमखान्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकांत 6 बाद 171 धावा केल्या. त्यात सूरज डोंगरेने 39, तर अनिकेत देसाईने 37 धावा केल्या. स्वप्नील मळीक 27, तर रॉबिन डिसोझा 28 धावांवर नाबाद राहिला. प्रत्येक तीन गडी बाद केलेल्या महेश भाईडकर व संजय नाईक यांनी नंतर इक्बाल इलेव्हनचा डाव 18.5 षटकांत 125 धावांत गुंडाळला.

Panajim cricket Team
गोव्याच्या फलंदाजांची शरणागती!

बक्षीस वितरण गिरिराज वेंगुर्लेकर, पणजी जिमखान्याचे अध्यक्ष मनोज काकुले, खजिनदार सुरेश कारापूरकर, सदस्य प्रशांत काकोडे यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण झाले. विजेत्या संघाला 50,000 रुपये व करंडक, उपविजेत्या संघाला 25,000 रुपये व करंडक देण्यात आला. अमेय धामसेकर (उत्कृष्ट फलंदाज), सहदेव खांडोळकर (उत्कृष्ट गोलंदाज) व अविनाश गावस (स्पर्धेचा मानकरी) यांना वैयक्तिक बक्षिसे देण्यात आली.

Panajim cricket Team
कुचबिहार करंडक क्रिकेट स्पर्धेत गोव्याचा पुन्हा मोठा पराभव!

संक्षिप्त धावफलक : पणजी जिमखाना ः 20 षटकांत 6 बाद 171 सूरज डोंगरे 39, अनिकेत देसाई 37, स्वप्नील मळीक नाबाद 27, रॉबिन डिसोझा नाबाद 28, तुषार सावंत 2-19, मुख्तार कादरी 2-49, बसूराज मदार 1-26)

वि. वि. इक्बाल इलेव्हन : 18.5 षटकांत सर्वबाद 125 (मारूती हुग्गी 20, विकास देसाई 18, अमेय धामसेकर 18, बसूराज मदार 16, पुष्पशील देसाई 10, सर्फराज नवाझ नाबाद 20, महेश भाईडकर 3-23, संजय नाईक 3-28, सहदेव खांडोळकर 2-21, अचित शिगवण 1-12).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com