Pakistan Beautiful Sports Anchors: सोशल मीडियावर भारत आणि हिंदूविरोधी पोस्टमुळे पाकिस्तानी स्पोर्ट्स प्रेझेंटर जैनब अब्बास मायदेशी परतली आहे.
9 वर्षांपूर्वी तिने भारतविरोधी पोस्ट केली होती, त्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे वकील विनीत जिंदाल यांनी एफआयआर दाखल केला.
दरम्यान, हा एफआयआर अशावेळी दाखल करण्यात आला आहे, जेव्हा आयसीसी विश्वचषक सुरु आहे आणि केवळ पाकिस्तान संघच नाही तर अम्पायर, मॅच प्रेझेंटर आणि कमेंटेटरही भारतात आले आहेत. जैनबचे भारतातून जाणे हा पाकिस्तानसाठी मोठा धक्का आहे.
भारतीय दूतावासाने आयसीसी क्रिकेट विश्वचषकासाठी तिचा व्हिसा मंजूर केला होता. याबाबत आयसीसीला (ICC) विचारले असता, संस्थेने सांगितले की, जैनब वैयक्तिक कारणांमुळे मायदेशी परतली आहे.
पाकिस्तानी चॅनल समा टीव्हीने दिलेल्या माहितीनुसार, जैनब अब्बास सध्या दुबईत आहे. वकील विनीत जिंदाल यांनी तिच्याविरुद्ध एफआयआर (FIR) दाखल केल्यानंतर तिने हे पाऊल उचलले आहे.
निवेदनानुसार, 'अॅडव्होकेट विनीत जिंदाल यांनी दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलमध्ये जैनब अब्बास विरोधात तक्रार दाखल केली आहे.
जिंदाल यांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 153-ए, 295, 506 आणि 121 आणि जैनबच्या वक्तव्याबाबत आयटी कायद्याच्या कलम 67 अंतर्गत गुन्हा नोंदवण्याची विनंती केली आहे, जे भारतविरोधी आणि हिंदूंच्या भावना दुखावणारे आहे.
ते म्हणाले की, जैनबला आयसीसी विश्वचषक, आयसीसी आणि बीसीसीआयच्या प्रेझेंटर पॅनेलच्या यादीतून तात्काळ हटवावे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.